मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अय्यो! भल्या पहाटे टॉयलेटमध्ये घुसली महिला, समोरचं चित्र पाहून किंचाळत आली बाहेर

अय्यो! भल्या पहाटे टॉयलेटमध्ये घुसली महिला, समोरचं चित्र पाहून किंचाळत आली बाहेर

तुम्ही पहाटेच्या वेळी टॉयलेटमध्ये गेलात आणि समोर भलंमोठं अजगर (Python in the toilet) बसलेलं दिसलं, तर तुम्ही काय कराल?

तुम्ही पहाटेच्या वेळी टॉयलेटमध्ये गेलात आणि समोर भलंमोठं अजगर (Python in the toilet) बसलेलं दिसलं, तर तुम्ही काय कराल?

तुम्ही पहाटेच्या वेळी टॉयलेटमध्ये गेलात आणि समोर भलंमोठं अजगर (Python in the toilet) बसलेलं दिसलं, तर तुम्ही काय कराल?

  • Published by:  desk news

लंडन, 12 ऑक्टोबर : तुम्ही पहाटेच्या वेळी टॉयलेटमध्ये गेलात आणि समोर भलंमोठं अजगर (Python in the toilet) बसलेलं दिसलं, तर तुम्ही काय कराल? एका महिलेला नेमका असाच अनुभव आल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमाराला ही महिला टॉयलेटमध्ये गेली आणि (Woman saw a big python in her toilet) समोर असलेलं भलंमोठं अजगर पाहून घाबरली. किंकाळ्या फोडत ती टॉयलेटमधून बाहेर आली आणि आपल्या मित्रांना तिनं ही गोष्ट सांगितली. मित्रांनी तिची (Friends made fun of her) खिल्ली उडवली. मात्र त्यांनी स्वतः जेव्हा टॉयलेटमध्ये डोकावून पाहिलं, तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

अशी घडली घटना

इंग्लंडच्या स्टॉरब्रिजमध्ये राहणाऱ्या लॉराला पहाटे पाचच्या दरम्यान टॉयलेटमध्ये एक भलंमोठं अजगर बसल्याचं दिसलं. अजगराला पाहून लॉरा कमालीची घाबरली आणि आरडाओरडा करत बाहेर पळाली. बाहेर तिचे मित्र होते. रात्रभर पार्टी झाल्यामुळे अल्कोहोलच्या प्रभाव असावा आणि त्यामुळेच लॉराला अजगराचा भास झाला असावा, असं तिच्या मित्रांना वाटलं. मग तिच्या मित्रांनी या बाबीची खातरजमा करण्याचं ठऱवलं. ते टॉयलेटपाशी गेले आणि आत डोकावून पाहिलं. आतमध्ये खरोखरच मोठं अजगर होतं.

सर्पमित्राला केला फोन

लॉराचा भाऊ सर्पमित्र असल्यामुळे तिने त्याला बोलावून घेतलं. टॉयलेटमध्ये बसलेल्या अजगराला कसं पकडायचं याची योजना त्याने आखली आणि टॉयलेटमध्ये फ्लश करायला सांगितलं. लॉराच्या मित्रांनी टॉयलेट फ्लश केल्यावर सर्पमित्राने अजगराला अलगद पकडलं आणि पिशवीत बंद केलं. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली.

अजगर पाळीव असल्याचा संशय

सुरुवातीला हे अजगर पाळीव असल्याचा संशय सर्पमित्राने व्यक्त केला. अमेरिकेत अनेकजण अजगर पाळतात. त्यातीलच हा प्रकार असावा, असं सर्वांना वाटलं. मात्र त्यावर कुणीच दावा न केल्यामुळे हे अजगर RSPCA ला सोपवण्यात आलं. लॉराला या घटनेमुळं मोठा धक्का बसला असून प्रत्येकवेळी टॉयलेटमध्ये जाताना आपल्याला अजगर असल्याचीच भीती वाटत असल्याचं ती म्हणते.

First published:

Tags: England, Python, Python snake