Home /News /maharashtra /

अवहेलना थांबणार तरी कधी? सावरकरांनी लढा उभारलेल्या गावातून थेट मोदी सरकारला सवाल

अवहेलना थांबणार तरी कधी? सावरकरांनी लढा उभारलेल्या गावातून थेट मोदी सरकारला सवाल

सत्तेत आलो की भारतरत्न देणार ही भाषा करणाऱ्या भाजप सरकारची यंदा केंद्रात दुसरी टर्म सुरू आहे. तरी अजूनही...

 नाशिक, 05 मार्च : भारतरत्न (bharat ratna award) आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान, आपल्या देशासाठी अमूल्य योगदान दिलेल्या व्यक्तीला या गौरवानं, सन्मानीत करण्यात येतं. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीर म्हणून आदरानं उल्लेख होणाऱ्या विनायक दामोदर सावरकर(vinayak damodar savarkar) यांना गौरविण्यात यावं ही अनेक वर्षांपासून असलेली मागणी आता पुन्हा एकदा ऐरणीवर समोर आली आहे. कारण महाराष्ट्र विधानसभा सुरू असलेल्या अधिवेशनात (maharashtra assembly budget session 2021) सुरू झालेल्या राजकीय कोपरखळ्या. नेमके याचेच पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावातून आपला लढा सावरकरांनी उभारला आणि पाहता पाहता तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आजही त्यांच्या भगूरच्या घरातील पाऊलखुणा,सावरकरांच्या आठवणी जाग्या करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित करणं, हा सावरकरांचा नाही तर या पुरस्काराचा सन्मान असल्याचे, भगूरकर ठासून सांगतात. उद्धव ठाकरे आणि अजितदादांची जोरदार बॅटिंग, भाजप नेत्यांना पडले भारी! जिल्ह्यातील भगूर हे सावरकरांचं जन्मस्थान. त्यांचा या गावातील पूरातन वाडा आता स्मारकात रुपांतरीत करण्यात आला. पुरातत्व खातं,या वाड्याची आता जबाबदारी सांभाळतं. असं जरी असलं तरी भगूर गावातील ग्रामस्थ,आजही अत्यंत आत्मियतेनं या वाड्याची निगा राखतात. या भूमीतील सगळेच नागरिक, सावरकरांवर नितांत प्रेम करणारे.आणीबाणी ही आमची चूक होती, ही नुकतीच कबुली देणाऱ्या राहुल गांधींना लवकरच उपरती होईल आणि सावरकरांना,माफीवीर म्हणण्यावरूनही ते माफी मागतील असं भगूरकरांना वाटतंय. खरंतर सावरकरांच्या नावावर सगळ्याचं राजकीय पक्षांनी राजकारण केले. सत्तेत आलो की भारतरत्न देणार ही भाषा करणाऱ्या भाजप सरकारची यंदा केंद्रात दुसरी टर्म सुरू आहे. तरी अजूनही त्यांनी सावरकरांना,उपेक्षित ठेवलंय ही भावना आहेत भगूरच्या सर्वसामान्य स्थानिकांची. मुंबईत शिवसेनेची स्थापना केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई बाहेरील पहिली शाखा ही सुद्धा नाशिक जिल्ह्यातील याच भगूरला स्थापन केली. 'स्वातंत्र्यवीराच्या भूमीला वंदन करून हा यज्ञ सुरू करूया' हे बाळासाहेब ठाकरे यांचं तेव्हाचं वक्तव्य बोलकं होतं. केवळ अठरा वर्ष नाही, पदवीधर होईपर्यंत करावा लागणार मुलाचा सांभाळ - न्यायालय हे सर्व मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले कारण विधानसभा अधिवेशनात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या नावानं फोडलेले खडे. का खरोखर सावरकरांचा मरणोत्तर सन्मान हा फक्त राजकीय प्रश्न झालाय का? आता तरी त्यांची अवहेलना थांबणार का ? हे सावरकर प्रेमींना पडणारे सवाल आज तरी अनुत्तरीत आहे,हे नक्की.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Nashik, Vinayak damodar savarkar, भाजप, शिवसेना

पुढील बातम्या