Home /News /maharashtra /

Shivsena Eknath Shinde : तुम्ही झोपला होता त्यावेळी राज्याच्या राजकारणात काय घडलं? हे आहेत 11 मुद्दे

Shivsena Eknath Shinde : तुम्ही झोपला होता त्यावेळी राज्याच्या राजकारणात काय घडलं? हे आहेत 11 मुद्दे

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (shiv sena leader eknath shinde) यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

  मुंबई, 21 जून : शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (shiv sena leader eknath shinde) यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी बंड पुकारलं आहे. त्यांच्या या भूमीकेमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) सरकार धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

  दरम्यान शिंदे यांना जवळपास 35 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला जातोय. याचबरोबर शिंदे यांनी काल सुरतहून थेट गुवाहाटी (surat, guwahati) गाठल्याने त्यांच्या हालचाली सवता सुभा मांडण्याच्या असल्याचे दिसून येत आहे. मागच्या 24 तासांत राज्याच्या राजकारणात बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या नेमका घटनाक्रम कसा होता. कालची रात्र शिवसेनेसाठी (shiv sena) कशी वैऱ्याची ठरली जाणून घ्या.

  1) काल दिवसभरात एकनाथ शिंदे हे गुजरातच्या सूरतमधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबले होते.

  2) दरम्यान त्यांना शिवसेनेचे काही पदाधिकारी भेटण्यास आले यावरून त्यांनी आपली भूमीकाही स्पष्ट केली. 

  3) सुरत आणि मुंबई हे अंतर जवळ असल्याने शिवसेनेचे पुन्हा नेते भेटण्याच्या शक्यतेने त्यांनी रात्रीत गुवाहाटी गाठले.

  4) मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट करून गुवाहाटीमध्ये एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेल्याचे समोर आले. सुरतच्या विमानतळावर तीन स्पाइसजेटच्या विमानाने गुवाहाटीला रवाना झाल्याचा त्यांचा व्हिडीओ समोर आला.

  5) एकनाथ शिंदे जात असताना त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली, तसेच सगळे आमदार व्यवस्थित आणि चांगले असल्याचेही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

  6) आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला.

  7) एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय सुद्धा सोबत होते. रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय हे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. 

  8) गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार यांची जबाबदारी संजय कुटे, मोहित खंबोज, डोंबिवली आमदार चव्हाण यांच्याकडे दिली आहे. या तीन लोकांवर सर्व समन्वय आणि सोबत राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

  9) काल रात्री जात असताना महाविकास आघाडीतील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आजी, माजी मंत्री मिळून 7 बडे नेते असल्याचे दिसून आले.

  10) काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील सगळ्यांना चकमा देत पळून आल्याचीही घटना समोर आली आहे.

  11) शिवसेनेच्या एवढ्या आमदारांनी थेट पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जावून अशाप्रकारचं धाडस केल्याने राज्यभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Maharashtra politics, Shiv Sena (Political Party), Top news maharashtra, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या