मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाआधी कोल्हापूरमधील वातावरण तापलं

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाआधी कोल्हापूरमधील वातावरण तापलं

स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, अशी आक्रमक भूमिका कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, अशी आक्रमक भूमिका कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, अशी आक्रमक भूमिका कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

कोल्हापूर, 27 फेब्रुवारी : कीर्तनकार इंदोरीकर महाराज शुक्रवारी कोल्हापुरात असणार आहेत. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात इंदोरीकर यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि इतर पुरोगामी संघटनांचा इंदोरीकर महाराजांना विरोध आहे. स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, अशी आक्रमक भूमिका कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता इंदोरीकर महाराजांचा आक्रमक होणार आहे. मात्र त्याआधी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते विद्यापीठात जाऊन जाब विचारणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरात इंदोरीकर महाराज यांच्या एण्ट्रीआधी चांगलंच वातावरण तापल्याची चर्चा आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकाला अंनिसची नोटीस

इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई न केल्याने आता अहमदनगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य समन्वयक रंजना गावंडे यांनी नोटीस बजावली आहे. इंदोरीकर महाराजांवर 15 दिवसांत कारवाई न केल्यास यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करणार असल्याचे रंजना गावंडे यांनी सांगितले आहे.

सम-विषम तारखेच्या वादग्रस्त वक्तव्यावरून इंदोरीकर महाराज अर्थात निवृत्ती देशमुख हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात अनेक संघटनांनी आंदोलन केले होते. गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र प्रतिबंध समितीने (पीसीपीएनडीटी) इंदोरीकर महाराज यांना नोटीस बजावली होती.

त्यावर इंदोरीकर महाराजांनी खुलासा केला होता, 'मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलंच नाही..मी यूट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही'. इंदोरीकर यांनी जे उत्तरे दिली आहे तसं नसेल तर उत्तर समाधानकारक आहे. मात्र, ज्या वर्तमान पत्रात हे छापून आले त्यांनी उत्तर अजून दिले नाही, त्यांनी पुरावे द्यावे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले होते.

First published:

Tags: Indurikar maharaj, Kolhapur, Shivaji university