सोनिया गांधींचा शरद पवारांना खास फोन, शुभेच्छा देताना म्हणल्या...

सोनिया गांधींचा शरद पवारांना खास फोन, शुभेच्छा देताना म्हणल्या...

वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार यांनी निवडणुकीत बाजी पलटवून लावली. साताऱ्यातली पावसातली सभा तर देशभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती.

  • Share this:

जितेंद्र जाधव, बारामती 25 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तरी खरे सामनावीर ठरले ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. निकालानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती पवारांच्या परिश्रमांची. राजकारणाच्या आखाड्यात सामना एकतर्फे होऊ न देता पवारांनी भाजपसमोर राष्ट्रवादीचा आलेख उंचावून दाखवला. सगळं प्रतिकूल वातावरण, एक्झिट पोल्सनं दिलेल्या कमी जागा, यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात अतिशय निराशेचं वातावरण होतं. मात्र जसे निकाल यायला लागले तसे भाजपच्या तोंडचं पाणी पळालं. जे दावे करण्यात येत होते तसं काही घडत नव्हतं. तर काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीने सरस कामगिरी करत परिस्थिती बदलविण्याची ताकद कायम असल्याचं शरद पवारांनी दाखवून दिलं. यामुळेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पवारांना खास फोन करून त्यांचे आभारही मानले आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

VIDEO: भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची मुसंडी; 'या' जिल्ह्यात सुपडासाफ

वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार यांनी निवडणुकीत बाजी पलटवून लावली. साताऱ्यातली पावसातली सभा तर देशभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. पवारांच्या या मेहनतीचा फायदा काँग्रेसलाही झाला. त्यामुळे काँग्रेसची इभ्रत वाचली. त्यामुळे सोनिया गांधी यांनी शरद पवारांना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीतल्या निकालांबद्दल आभारही मानले. पवारांनी जी मेहनत घेतली आणि रणनीती आखली त्याचा काँग्रेसलाही फायदा झाला अशा भावना सोनियांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून चर्चाही झाली होती. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादीनेच काँग्रेसला बळ दिल्याचं सिद्ध झालं.

VIDEO : '...म्हणून विजयाचा आनंदही साजरा करावा असं वाटत नाही'

शिवसेना 'किंग' की 'किंगमेकर'

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला 220 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात 2014 च्या तुलनेत जागा कमी झाल्या. भाजपचे नेते स्पष्ट बहुमत मिळेल असं म्हणत होते. मात्र, त्यांना 40 जागा कमी पडल्या. यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेवर अवलंबून रहावं लागणार आहे. निकालानंतर आता सर्वांचं लक्ष शिवसेनेच्या भुमिकेकडे लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी खुली ऑफर दिली आहे. तर स्पष्ट बहूमतापासून ४० जागा दूर राहिलेल्या भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. सत्ता स्थापन करण्यापासून ते चालवण्यापर्यंत सेनेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ५६ जागा जिंकलेली शिवसेना किंगमेकर बनलीय. आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप

दरम्यान, शिवसेनेचे विजयी उमेदवार शनिवारी मातोश्रीवर येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्व विजयी उमेदवार आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये घेण्यात येणाऱ्या निर्णयावर महाराष्ट्रात पुढच्या पाच वर्षातलं राजकारण ठरणार आहे. आता भाजपसोबत युतीधर्म पाळून किंगमेकर व्हायचं की किंग होण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करायची याचाच निर्णय मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत होईल.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 25, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading