काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप, वंचितमुळे 23 उमेदवार पराभूत झाल्याचा दावा

काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप, वंचितमुळे 23 उमेदवार पराभूत झाल्याचा दावा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे 23 उमेदवार वंचित बहुजन आघाडीमुळे पराभूत झाले. सत्ताधाऱ्यांना वंचित आघाडीला पुढे करून जे काही करायचं होतं, ते करण्यात त्यांना यश आलं आहे,' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याचं या निकालातून स्पष्ट झालं. त्यानंतर भाजप आणि शिवसेना युती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला आणखी मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र काँग्रेसलाही समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्ताधारी भाजप-सेनेवर निशाणा साधला आहे.

'महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव झाला नाही. काश्मीरमधील कलम 370 यासारखे भावनिक मुद्दे चालले नाहीत. जनतेच्या समस्या सत्ताधारी भूमिका मांडण्यात कमी पडले. म्हणूनच त्यांच्या जागा घटल्या,' अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

शिवसेनेला खुली ऑफर

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत मोठा फटका बसला आहे. भाजपच्या काही जागा घटल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे युतीमध्ये आता शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. अशातच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. 'शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला काँग्रेस उत्सुक आहे. पण त्यासाठी मानसिकता त्यांनी तयार करावी. शिवसेनेचा प्रस्ताव आला तर पुढे काय करायचे ठरवता येईल,' असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटंल आहे.

विखेंवर वार

'नगर जिल्हा काँग्रेसमुक्त करू असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणत होत. पण जनता आमच्या पाठीशी हे दिसून आले,' असं म्हणत नगर जिल्ह्यात चांगल्या जागा जिंकल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या विखे पाटलांना टोला लगावला आहे.

अंतिम निकाल : अहमदनगर जिल्हा

कर्जत जामखेड -

▪रोहित पवार - राष्ट्रवादी - 1,35,824

▪राम शिंदे - भाजप - 92,477

राष्ट्रवादीचे रोहित पवार 43,347 मतांनी विजयी

नगर शहर-

▪संग्राम जगताप - राष्ट्रवादी - 81,217

▪अनिल राठोड - शिवसेना - 70,078

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 11,139 मतांनी विजयी

पारनेर -

▪निलेश लंके - राष्ट्रवादी 1,39,963

▪विजय औटी - शिवसेना - 80,125

राष्ट्रवादीचे निलेश लंके 59,838 मतांनी विजयी

श्रीगोंदा -

● बबनराव पाचपुते - भाजप - 1,03,258

● घनश्याम शेलार - राष्ट्रवादी - 98,508

भाजपचे बबनराव पाचपुते 4750 मतांनी विजयी.

राहुरी -

▪प्राजक्त तनपुरे - राष्ट्रवादी - 1,09,235

▪शिवाजी कर्डीले - भाजप - 85,908

राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे 23,327 मतांनी विजयी

शेवगाव -

▪मोनिका राजळे - भाजप 1,12,509

▪प्रताप ढाकणे - राष्ट्रवादी 98,215

भाजपच्या मोनिका राजळे 14,294 मतांनी विजयी

नेवासा -

▪शंकरराव गडाख - अपक्ष - 1,16,943

▪बाळासाहेब मुरकुटे - भाजप - 86,280

अपक्ष शंकरराव गडाख 30,663 मतांनी विजयी

श्रीरामपूर -

▪लहू कानडे - कॉग्रेस - 93,906

▪भाऊसाहेब कांबळे - शिवेसना - 74,912

कॉग्रेसचे लहू कानडे 18,994 मतांनी विजयी

कोपरगाव -

▪आशुतोष काळे - राष्ट्रवादी- 87,566

▪स्नेहलता कोल्हे - भाजप - 86,744

राष्ट्रवादीचे आशुतोष काळे 822 मतांनी विजयी

शिर्डी -

▪राधाकृष्ण विखे - भाजप - 1,32,316

▪सुरेश थोरात - कॉग्रेस - 45,292

भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील 87,024 मतांनी विजयी

संगमनेर -

▪बाळासाहेब थोरात - कॉग्रेस - 1,25,380

▪साहेबराव नवले - शिवेसना - 63,128

कॉग्रेसचे बाळासाहेब थोरात 62,252 मतांनी विजयी

अकोले -

▪किरण लहामटे - राष्ट्रवादी 1,13,414

▪वैभव पिचड - भाजप - 55,725

राष्ट्रवादीचे किरण लहामटे 57,689 मतांनी विजयी

VIDEO : 'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 01:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading