मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापूर: राष्ट्रवादीच्या नगसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल, खासगी सावकारीतून तरुणाला केली मारहाण

सोलापूर: राष्ट्रवादीच्या नगसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल, खासगी सावकारीतून तरुणाला केली मारहाण

व्याजाने घेतलेले 50 हजार रूपये आणि त्याचे व्याज असे मिळून 2 लाख रूपये देण्यासाठी नगरसेवकाने ही मारहाण केली.

व्याजाने घेतलेले 50 हजार रूपये आणि त्याचे व्याज असे मिळून 2 लाख रूपये देण्यासाठी नगरसेवकाने ही मारहाण केली.

व्याजाने घेतलेले 50 हजार रूपये आणि त्याचे व्याज असे मिळून 2 लाख रूपये देण्यासाठी नगरसेवकाने ही मारहाण केली.

सोलापूर मुंबई 18 ऑगस्ट: सोलापुरात राष्ट्रवादीचा नगरसेवक आणि मनपा सभागृह नेता असलेल्या किसन जाधव यांच्यावर खासगी सावकारकी आणि बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.  सलगर वस्ती जवळील अण्णासाहेब पाटील प्रशालेजवळ खाजगी सावकारीतून एका तरूणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.

प्रविण सिद्राम जाधव (वय 20) असे फिर्यादीचे नाव आहे. प्रविण जाधवने 6 महिन्यापुर्वी साडी विक्री व्यवसायासाठी नगरसेवक किसन जाधव याच्याकडून 50 हजार रूपये प्रतिमहिना 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते परंतु लॉकडाऊन सुरू झाल्याने साडी विक्री व्यवसाय झाला नाही.

त्यामुळे नगरसेवक आणि खाजगी सावकार किसन जाधव याने पैशासाठी तगादा लावला. प्रविण जाधव याची मावशी सातरस्ता येथील उत्कर्ष हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होती. तिला पाहण्यासाठी तो तिथे गेला असताना नगरसेवक किसन जाधव याची पत्नीही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यावेळी त्याने माझे घेतलेले 50 हजार रूपये आणि त्याचे व्याज असे मिळून 2 लाख रूपये कधी देणार अशी विचारणा केली.

राज्यात कोरोनामुळे उच्चांकी 424 जणांचा मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या

त्यावेळी साडी विक्रीचा व्यवसाय बंद आहे माझ्याकडे आता पैसे नाहीत मी थोड्या दिवसात पैसे अॅडजस्ट करून देतो असे सांगितले तेव्हा किसन जाधव याने तू पैसे दे नाही तर मी काय करू शकतो हे तुला माहित आहे का तुला दाखवतो असे म्हणून दमदाटी केली त्यानंतर प्रविण जाधव आणि त्याचा मित्र रिक्षात बसून जात असताना सलगरवस्ती जवळ मारहाण केली.

येथील अण्णासाहेब पाटील प्रशाले जवळ  किसन जाधव याच्या सांगण्यावरून तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, शुभम मरगु गायकवाड (सर्व रा. सेटलमेंट सोलापूर) यांनी मिळून चारचाकी गाडी व मोटारसायकलवरून येवून हातातील लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, बेसबॉल बॅटने हातावर दंडावर उजव्या पायाच्या नडगीवर, पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

एका छोट्या पॅकेटची मोठी कमाल, कोरोनापासून करतो बचाव; दाव्याबाबत FACT CHECK

अशी फिर्याद प्रविण जाधव याने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलीसांनी नगरसेवक खाजगी सावकार किसन जाधवसह 5 जणांविरूध्द सावकार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भुसनुर करीत आहेत

First published:

Tags: NCP, Solapur news