मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यातील गाडगीळ सराफ 50 कोटी खंडणी प्रकरण, अजित पवारांच्या निकटवर्तीयांची चौकशी

पुण्यातील गाडगीळ सराफ 50 कोटी खंडणी प्रकरण, अजित पवारांच्या निकटवर्तीयांची चौकशी

पुण्यातील प्रसिद्ध सराफ गाडगीळ यांच्याकडे 50 कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्याला चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे

पुणे, 13 मार्च : पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकणात आशिष पवार (वय 27), रमेश पवार (वय 32) आणि रुपेश चौधरी (वय 45) यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात गाडगीळ यांच्या कुटुंबातील महिलेची एक व्हिडीओ क्लिप चोरून बनवण्यात आली होती आणि ती दाखवून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. आशिष चौधरी याने पिस्तूल दाखवून सराफांना कोणाकडे वाच्यता केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही सराफाने आम्ही इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही असं सांगितल्यावर सराफांना धमकी दिली जात होती. मात्र यानंतर सराफांनी पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. हे वाचा - भयानक! ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तो दुसऱ्या दिवशी दारात झाला हजर! या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. मंगलदास बांदल हे माजी जिल्हापरिषद सदस्य, बांधकाम समितीचे माजी सभापती आणि शिक्षण समितीचे माजी सभापती आहे. बांदल हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. बांदल हे वादग्रस्त राहिले असून यापूर्वी 2017 मध्ये आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेमुळे छापेमारी केली होती.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: #Pune, NCP

पुढील बातम्या