Home /News /maharashtra /

अरेरे...ट्रकच्या धडकेत लाडक्या नातीसह आजीचा मृत्यू

अरेरे...ट्रकच्या धडकेत लाडक्या नातीसह आजीचा मृत्यू

समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि नातीला घेऊन असणाऱ्या आजी खाली पडल्या आणि त्यातच दोघींचाही मृत्यू झाला.

अहमदनगर 02 फेब्रुवारी : आपल्या लाडक्या नातीला घेऊन मोटरसायकलने निघालेल्या आजी-आजोबांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यात आजी आणि नातीचा मृत्यू झाला. नगर- पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील स्माईल स्टोन जवळ रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. मधुकर ठोकळ (वय 58 कामरगाव, ता.नगर) हे त्यांची पत्नी आशा ठोकळ आणि त्यांची नात ईशा अमोल ठोकळ यांच्यासह नगरहून कामरगावकडे जात होते. हे तिघेही मोटरसायकलने जात होते. यावेळी स्माईल स्टोनजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत आशा ठोकळ आणि ईशा ठोकळ यांचा मृत्यू झाला, तर मधुकर ठोकळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. मद्यधुंद पोलिसाची गुंडगिरी, गुन्हेगारांना सोबत घेत 'बार' मालकाला मारहाण घटनास्थळावरील नागरीक मदतीसाठी धावले. त्यांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा आणि ईश ठोकळ मृत झाल्याचे सांगितले. आजी आणि नातीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येतोय. फास्ट फूडला टक्कर देण्यासाठी ज्वारीचा मॉल, मराठमोळ्या दाम्पत्याची भन्नाट आयडिया या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येते आहे. जीप आणि ट्रक चालक अतिशय वेगाने वाहनं चालवतात. त्यामुळे अपघात घडत असल्याचं म्हटलं जातंय. याचा मोठा फटका छोटी वाहन आणि दुचाकीस्वारांना होत आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Ahamad nagar, Ahamadnagar

पुढील बातम्या