Home /News /crime /

मद्यधुंद पोलिसाची गुंडगिरी, गुन्हेगारांना सोबत घेत 'बार' मालकाला मारहाण

मद्यधुंद पोलिसाची गुंडगिरी, गुन्हेगारांना सोबत घेत 'बार' मालकाला मारहाण

गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

नाशिक 02 फेब्रुवारी : पोलिसांनी नागरीकांची सुरक्षा करावी अशी अपेक्षा असते. मात्र रक्षण करणाऱ्यांनीच जर कायदा हातात घेतला तर मुळ उद्देशांनाच धक्का बसतो. कायद्याचं रक्षण करण्यासाठी ज्यांची नियुक्ती केली जाते त्यांनीच जर त्याला पायदळी तुडवलं तर ते अतिशय गंभीर मानलं जातं. नाशिकमध्ये एका पोलिसाची अशी गुंडगिरी उघडकीस आल्याने खळबळ उडालीय. पोलिसांमधल्या अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घाला अशी मागणी केली जातेय. नाशिकच्या लेखा नगर भागातली ही घटना घडलीय. त्या घटनेचं CCTV फुटेजही पुढे आलं असून त्यावरून पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी असताना पोलिसांतील दादागिरीचा प्रकार घडला आहे. लेखानगर येथे बिअर बार मध्ये बिल देण्यावरून पोलिसाने सराईत गुन्हेगाराच्या मदतीने बार चालकाला मारहाण केली. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाल्या नंतर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंच जाणाऱ्या झोक्याने मृत्यूपर्यंत नेलं, 13 वर्षाच्या चिमुरडीचा ह्रदयद्रावक अंत लेखा नगर येथील हॉटेल स्पॅक्स मध्ये पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव हा त्याच्या साथीदारांसोबत बिअर घेण्यासाठी गेला होता. बिअर घेतल्यानंतर बारचालक भास्कर येतप्पा शेट्टी याने जाधव कडे पैशाची मागणी केली. मात्र मी पोलीस असून तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणत शिवीगाळ केली. 'शादी डॉट कॉम'वरून महिलेला जाळ्यात ओढले, पण VIDEO CALL मुळे झाला भांडाफोड इतकंच नाहीतर पोलीस एकनाथ जाधव व त्याचा साथीदार पप्पू कांबळे याने शेट्टी यास मारहाण देखील केली. घटनेनंतर बारचालक शेट्टी याने अंबड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केलीय. याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत. बिलाच्या वादावरून पोलीस कर्मचारी भगवान जाधव याने बार चालकाला मारहाण केली या सर्व घटनेचे दृश्य ससीटीव्हीत कैद झाले आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Nashik police

पुढील बातम्या