Home /News /mumbai /

फास्ट फूडला टक्कर देण्यासाठी उभारला ‘ज्वारीचा मॉल’, मराठमोळ्या दाम्पत्याची भन्नाट आयडिया!

फास्ट फूडला टक्कर देण्यासाठी उभारला ‘ज्वारीचा मॉल’, मराठमोळ्या दाम्पत्याची भन्नाट आयडिया!

विदेशी फास्ट फूडला टक्कर देण्यासाठी देशी ज्वारीचा मॉल ही कल्पना एका मराठमोळ्या दाम्पत्याची आहे.

    अहमदनगर, 01 फेब्रुवारी : मंडळी, सध्याचा जमाना फास्ट फूडचा आहे. आजच्या पिढीला सगळं कसं इंन्सटंच हवं असतं. अशा या फास्ट फूडच्या इन्स्टंट जमान्यात डाऊन मार्केट झालेली ज्वारी आता चक्क मॉलमध्ये अवतरलीय. ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल, पण अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरामध्ये चक्क ज्वारी-बाजरीपासून बनलेल्या विविध उत्पादनांचा मॉल सुरु झालाय. विदेशी फास्ट फूडला टक्कर देण्यासाठी देशी ज्वारीचा मॉल ही कल्पना एका मराठमोळ्या दाम्पत्याची आहे. ज्या काळात ज्वारी खाणं काहीसं डाऊन मार्केट मानलं जातं अशा काळात ज्वारीचं आरोग्यविषयक महत्व पटवून देत तिला ग्लॅमराईज करण्याचा या मॉलच्या माध्यमातून प्रयत्न केला गेलाय. ज्वारीला गतवैभव मिळवून देण्यासाठी फडतरे दाम्पत्य सातत्यानं धडपडताहेत. तात्यासाहेब फडतरे यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून एक वेगळी वाट निवडली. भाकरी पुरती मर्यादीत असलेली ज्वारी अनेक रुपात ग्राहकांसमोर आणण्याची कल्पना त्यांना सुचली. कल्पना इंट्रेस्टिंग असली तरी वाट खडतर होती, पण तरीही तात्यासाहेबांनी पत्नी सरोजिनी यांच्या मदतीनं मोठ्या जिद्दीनं हे आव्हान स्वीकारलं. सरकारची कोणतीही मदत नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली. ज्वारी बाजरीपासून चिवडा, रवा, इडली पीठ, पोहे असे पर्याय त्यांनी निर्माण केले. या पदार्थांचा त्यांनी आता मॉलच सुरु केलाय. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी या मॉलचं उद्घाटन केलं. सरकारनंही अशा उपक्रमाच्या पाठीशी उभं राहण्याची अपेक्षा शालिनीताई विखे पाटलांनी व्यक्त केलीय. फास्टफुडच्या जमान्यात केवळ जाहिरातीला भुलून आरोग्य वर्धक खाणं आपण विसरून गेलोय. पण सुदृढ आणि सक्षम युवा पीढी घडवण्यासाठी ज्वारी बाजरीच्या पदार्थांना सरकारनं प्रोत्साहन देण्यीच गरज आहे. फास्ट विदेशी फूडला टक्कर देण्यासाठी देशी ज्वारीचा हा मॉल अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. शिवाय ज्वारीलाही अच्छे दिन आणू शकतो.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या