जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सगळचं संशयास्पद...फक्त पाणी पिण्याचं निमित्त झालं आणि विद्यार्थ्यीनीचा जीव गेला

सगळचं संशयास्पद...फक्त पाणी पिण्याचं निमित्त झालं आणि विद्यार्थ्यीनीचा जीव गेला

सगळचं संशयास्पद...फक्त पाणी पिण्याचं निमित्त झालं आणि विद्यार्थ्यीनीचा जीव गेला

घटनेच्या दिवशी मुलगी प्रयोगशाळेत होती. तिथे तिचं मैत्रिणीसोबत भांडण झालं होतं असंही सांगितलं जातेय. तिने तिच्याच बॉटमधलं पाणी प्यायलं होतं असं सांगितलं जातेय.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर 26 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरटी गावातील दहावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू झालाय. गेल्या पाच दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती पण अखेर तिचा मृत्यू झालाय. पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली आहे. सानिका माळी असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती सोळा वर्षांची होती. सानिकाचा मृत्यू झाल्यावर संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी तिचा  मृतदेह शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवला होता, तसेच पाण्याच्या बाटलीत विष आले कुठून याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. तर नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही गाव बंद ठेवून निषेध नोंदवला. नातेवाईक व नागरिकांच्या भूमिकेमुळे परिसरात आणि गावात तणावाच वातावरण निर्माण झाल होत. पण पोलिसांनी उशिरा का असेना घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. दहावीत शिकणारी विद्यार्थिनी सानिकाला पाण्याच्या बाटलीतील पाणी पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते. तिला उपचारासाठी शिरोळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप आई-वडीलांनी केला आहे. सविताभाभी नेमकी कुणाची? अश्लील उद्योग मित्र मंडळाला नोटीस तर पोलीस आता सर्व बाजू तपासून पाहात आहेत. घटनेच्या दिवशी मुलगी प्रयोगशाळेत होती. तिथे तिचं मैत्रिणीसोबत भांडण झालं होतं असंही सांगितलं जातेय. तिने तिच्याच बॉटमधलं पाणी प्यायलं होतं असं सांगितलं जातेय. त्यानंतरच तिची प्रकृती बिघडली होती. हेही वाचा… वादग्रस्त ‘एल्गार परिषद’ प्रकरणी शरद पवारांना समन्स बजवणार, हे आहे कारण सावरकरांच्या मुद्यावर भाजप आक्रमक, शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kolhapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात