जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / सविताभाभी नेमकी कुणाची? अश्लील उद्योग मित्र मंडळाला नोटीस

सविताभाभी नेमकी कुणाची? अश्लील उद्योग मित्र मंडळाला नोटीस

सविताभाभी नेमकी कुणाची? अश्लील उद्योग मित्र मंडळाला नोटीस

मात्र पुणेकरांमध्ये ही सविताभाभी कोण याबद्दल उत्सुकता लागली होती. अखेर सविताभाभीचं गुढ उकललं आणि अश्लील उद्योग मित्र मंडळाचा प्रताप समोर आला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे 26 फेब्रुवारी : पुण्यात काही दिवसांपूर्वी लागलेल्या सविताभाभी नेमकी कुणाची? या पोस्टर्समुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा प्रकार अश्लील उद्योग मित्र मंडळाचा प्रसिद्धी करण्याचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता हा वाद थेट कोर्टात पोहोचला असून सविताभाभी या कॉमिक कॅरेक्टरवर निलेश गुप्ता यांनी दावा सांगत नोटीस धाडलीय.अश्लील उद्योग मित्र मंडळ सिनेमाच्या निर्मात्यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. सविताभाभी हे पात्र कॉमिक कॉपीराईट असताना त्याबद्दल परवानगी न घेता त्याचा वापर केल्याबद्दल ही पाठवलीय नोटिस पाठवली आहे. काय आहे प्रकार? सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात चक्क पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या ‘सविताभाभी’च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले होते. यानंतर मात्र पुणेकरांमध्ये ही सविताभाभी कोण याबद्दल उत्सुकता लागली होती. अखेर सविताभाभीचं गुढ उलगडलं आहे. ही अश्लील उद्योग मित्र मंडळ या नव्या चित्रपटाची जाहिरात असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता धर्मकीर्ती सुमंत, अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांचा हा उपक्रम आहे. ही जाहिरात त्यांच्या आगामी सिनेमाची आहे. सावरकरांच्या मुद्यावर भाजप आक्रमक, शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न याशिवाय त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आवाज आहे. यामध्ये सई ताम्हणकर स्वत:ला सविता असल्याचं म्हणतं आहे. गरजेपेक्षा जास्त माहिती आहे मात्र तुम्ही तिला कधीच पाहिलं नाही..जिला कुणी कधीच पाहिलेलं नाही…असं सई म्हणाली आहे. यामध्ये एका तरुणाचाही आवाज आहे. 6 मार्च 2020 मध्ये या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च होणार आहे. अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत आहे. होर्डिंग्सची शहरात चर्चा पुण्यातल्या म्हात्रे पूल आणि नीलायम ब्रिज जवळ लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग्सची शहरभरात जोरदार चर्चा सुरू झाली होती. या होर्डिंगवर ‘सविताभाभी तू इथंच थांब!!’ या आशयाचे शब्द या पोस्टरवर आहेत. सविताभाभी तू इथंच थांब म्हटल्याचे होर्डिंग पाहून पुणेकरांचे पाय थांबले आणि हसूही उमटले. परंतु, होर्डिंगवर उल्लेख केलेल्या सविताभाभी नेमक्या कोण? अश्लील कॉमिक कॅरॅक्टर असलेल्या सविताभाभीचा हा संदर्भ आहे का? याबाबत काही कळू शकले नाही. येणारे जाणारे थांबून हे होर्डिंग वाचत आहेत. काही अर्थ लागतो का ते पाहत आहेत आणि काही संदर्भ लागला नाही की रेंगाळून पुढे जात होते. पुण्यातील सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारासह चौघांना अटक पुण्यात बुचकळ्यात टाकणारे असे होर्डिंग आताच लागले नाही. याआधीही नाटक निर्माते, चित्रपट निर्मात्यांनी बॅनरबाजीची शक्कल लढवली होती. काही वर्षांपूर्वी ‘दादा,एक गुड न्यूज आहे’ असे पोस्टर पुण्यात झळकले होते. या पोस्टरमुळेही चांगलाच गदारोळ उडाला होता. एवढंच नाहीतर पोलिसांनी हे पोस्टर हटवलेही होते. पण, दुसऱ्या दिवशी अभिनेत्री प्रिया बापटही हे नाटकाचं पोस्टर असल्याचं जाहीर केलं. ‘दादा,एक गुड न्युज आहे’चं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आलं. या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे यांच्या भूमिका होती. विशेष म्हणजे, प्रिया बापटने या नाटकाची निर्मिती केली होती.

13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सक्षम कारावास

बरं हा प्रकार इथंच थांबला नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये ‘शिवडे आय एम सॉरी!’ आणि ‘सुंदर बायका साडी कुठून खरेदी करतात’ या होर्डिंगनीही एकच धमाल उडवली होती. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात प्रियकराने ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले होते. हे बॅनर पाहून पोलीसही चक्रावले. तपासानंतर प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप केल्याचे उघड झालं होतं. आता ‘सविताभाभी’च्या नावाने पोस्टरबाजी करून नेमका काय हेतू आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात