रक्षाविसर्जन कार्यक्रमात नातेवाईकांनी घेतलं जेवण, 37 जणांना विषबाधा

रक्षाविसर्जन कार्यक्रमात नातेवाईकांनी घेतलं जेवण, 37 जणांना विषबाधा

गुरूवारी पहाटे पासून अन्न खाल्लेल्यांना पोटदुखी, जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. सर्वजण भयभीत झाले.

  • Share this:

कोल्हापूर 31 जानेवारी : पाडळी (ता.हातकणंगले) येथील मानेवाडीत  झालेल्या रक्षाविसर्जन कार्यक्रमात दिलेल्या अन्नामुळे 37 जणांना विषबाधा झाली. नातेवाईक आणि भावकी मंडळींना यावेळी जेवण देण्यात आलं होतं. विषबाधा झालेल्या रुग्णांवर नवे पारगावच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तात्काळ उपचार केल्याने परिस्थिती नियंञणात आली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. घटनेची नोंद वडगाव पोलीसांनी घेतली असून चौकशीही सुरु केलीय. दरवेश पाडळी (ता.हातकणंगले) गावाच्या पश्चिमेस मानेवाडी वस्ती आहे. येथील अवधुत रामचंद्र पाटील यांच्या घरी आजोबा दत्ताञय पाटील यांचे काल बुधवारी रक्षाविसर्जन झाले. सकाळी व रात्री भाऊकीने व नातेवाईकांच्या घरातुन आलेले जेवण एकत्रित केले होते.

60 जणांनी बुधवारी सकाळी व रात्री जेवण घेतले. गुरूवारी पहाटे पासून अन्न खाल्लेल्यांना पोटदुखी, जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. सर्वजण भयभीत झाले. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची जाणीव झाली. सर्वांनी नवे पारगाव च्या  ग्रामीण रूग्नालयात उपचारासाठी आज गुरूवारी धाव घेतली. साठ पैकी 37 रुग्ण येथे दाखल झाले. त्यातील दहा जणांवर बाह्य रुग्ण उपचार करून घरी  पाठविले तर 27 जणांवर उपचार सुरू आहेत.

मंत्र्यांमध्ये भांडणं असल्याचं सांगणं म्हणजे मुद्दाम केलेला चावटपणा - अजित पवार

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.मौला जमादार, वैद्यकीय अधिक्षक डाॅ.बी.एस. लाटवडेकर, डॉ.ज्योती कांबळे, डाॅ.अनिता शहा व परिचारिका कर्मचारी यानी तात्काळ उपचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

महाराष्ट्रातील शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल 21 लाखांची लूट

घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.योगेश साळी, हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुहास कोरे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली आणि उपचारासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.

 

 

First Published: Jan 31, 2020 10:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading