Home /News /crime /

भर चौकात तरुणाची धार धार शस्त्राने वार करून हत्या

भर चौकात तरुणाची धार धार शस्त्राने वार करून हत्या

तरुण नातवाची हत्या झाल्याने ती वृद्ध आज्जी आता पोरकी झाली आहे.

    पंढरपूर 02 फेब्रुवारी : मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथील सागर सुभाष वाघमोडे (20) या तरुणाची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. ही घटना सायंकाळी 7 च्या सुमारास खडकी गावात घडला आहे. याबाबत परिसरातील एका व्यक्तीने ही हत्या केल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांना आहे. सागर वाघमोडे हा खडकी चौकात थांबला असता अज्ञात कारणावरून एकाने तिथे येऊन सागर यास मारहाण केली त्यात जो जखमी झाला त्यास उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, मयत सागर वाघमोडे याचे आई-वडील हे कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी करण्यासाठी गेले आहेत. सागर हा आज्जी जवळ राहत होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्येमागचं नेमकं कारण काय आहे याचा छडा लावण्याचं काम पोलीस करत आहेत. आर्थिक कारणांमुळे की इतर दुसऱ्या कारणांमुळे ही हत्या झाली हे शोधणं पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. पोलिसाची गुंडगिरी, तक्रार करणाऱ्या तरुणाचीच केली धुलाई, VIDEO VIRAL या भागात दरवर्षी उस तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असतं. ज्या ठिकाणी ऊस आहे त्या ठिकाणी मजुर जात असतात. त्यामुळे अनेक प्रश्नही निर्माण होतात. घर दार सोडून बाहेरगावी जाण्यामुळे घरी वृद्ध मंडळी थांबलेली असतात. अशा आपल्या आजीला सांभाळण्यासाठी सागर हा गावात थांबला होता. तरुण नातवाची हत्या झाल्याने वृद्ध आज्जी आता पोरकी झाली आहे. हेही वाचा... मद्यधुंद पोलिसाची गुंडगिरी, गुन्हेगारांना सोबत घेत 'बार' मालकाला मारहाण नात्यातला रक्तपात, काकानेच झाडली पुतण्याच्या छातीत गोळी!

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या