Home /News /maharashtra /

हातपाय दाबून थकलो, आता गळा दाबायची वेळ, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विद्यार्थी आक्रमक

हातपाय दाबून थकलो, आता गळा दाबायची वेळ, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विद्यार्थी आक्रमक

पाणी आमच्या हक्कांचं नाही कुणाच्या बापाचं, या घोषणांनी विद्यार्थ्यांनी सभागृह दणाणून सोडलं.

औरंगाबाद 02 फेब्रुवारी : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला आहे. या प्रश्नावर आज औरंगाबदमध्ये मराठवाडा पाणी परिषद सुरू झाली. या परिषदेत भाजप चे 6 आमदार उपस्थित होते. इतर पक्षीय आमदारांनी मात्र दांडी मारली. सेनेचे एकमेव संजय सिरसाट उपस्थित होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराने हजेरी न लावली नाही. काही आमदारांना लोकांचं देणं घेणं नाही. त्यांना पाणी प्रश्नावर आस्था नाही असा आरोप करत विद्यार्थ्यांनी आज सगळ्यांना धारेवर धरलं. बैठक सुरु असतानाच काही विद्यार्थी आत घुसले आणि त्यांनी आपला विरोध आक्रमकपणे नोंदवला. एवढे दिवस आम्ही सरकारचे हात-पाय दाबत होतो. त्यांना प्रश्न समजावून सांगत होतो. मात्र त्यांना प्रश्नच समजत नव्हता. आता गळा दाबायची वेळ आल्याचं मत या आक्रमक विद्यार्थ्यांनी मांडलं. पाणी आमच्या हक्कांचं नाही कुणाच्या बापाचं, या घोषणांनी विद्यार्थ्यांनी सभागृह दणाणून सोडलं. मराठवाड्याला मिळणारं हक्काचं पाणी पश्चिम महाराष्ट्रात वळविण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप होतोय. या मुद्यावर काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी उपोषणही केलं होतं. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी 27 जानेवारीला औरंगाबदमध्ये उपोषण केलं. या उपोषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे पाटीलही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी हे सरकार विरोधातलं उपोषण नाही तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आहे असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. ‘हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर’, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात येण्यापूर्वी पाण्यावर काम करत आहेत, मी भाजपची कार्यकर्ता आहे पण समाजसेविका म्हणून काम करणार, मला कोणती लालसा नाही, तुमच्या मनात माझं स्थान आहे ते सर्वोच्च आहे, मला अमेरिका राष्ट्राध्यक्ष दिलं तरी मला ते नको. सरकार येऊन शंभर दिवस झाले नाही तोच उपोषण केलं त्यामुळं काहीजण पोटशूळ आला असं म्हणतील, मात्र सरकारनं स्वप्न पूर्ण करावं, शेतात पाणी आल्यावर तो आत्महत्या करणार नाही, त्याला कर्जमाफीची गरज नाही. भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली, महिला तहसिलदाराचा केला आक्षेपार्ह उल्लेख माझा कारखाना असून खूप अडचणी आहे, कसा लोकांना रोजगार मिळेल, पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस पाहून डोळे दिपतात मात्र आमच्याकडे पाणी दिसत नाही, इथले लोक रोजगार साठी स्थलांतर करत आहेत, काही म्हणतात तुम्ही काय केलं, मला कोणाचा राग नाही लोभ नाही, मी समाजसेविका आहे, सरकार विरोधी उपोषण नाही तर लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Marathawada

पुढील बातम्या