Home /News /crime /

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, 70 गाड्यांची तोडफोड

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, 70 गाड्यांची तोडफोड

तीन गुंडानी दहशत माजवण्यासाठी पुण्यात तब्बल 55 गाड्या फोडल्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्येही दहशत माजवली.

    चंद्रकांत फुंदे/गोविंद वाकडे पुणे 02 फेब्रुवारी : पुण्यातील तळजाई वसाहतीमध्ये तीन गुंडानी दहशत माजवण्यासाठी तब्बल 55 गाड्या फोडल्यात त्यात 22 टु व्हिलर, टेम्पो, आणि रिक्षांचं मोठं नुकसान झालं. रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडलाय. यावेळी काही स्थानिक रहिवाशांनी त्यांना विरोध करताच त्यांनी कोयत्याचा धाक दाखवला आणि गाड्या फोडण्याचा कृत्य सुरूच ठेवलं यावरून केवळ दहशत माजवण्यासाठीच हा प्रकार घडलाय. वर्षभरापूर्वीही याच भागात अशाच पद्धतीने तब्बल 55 गाड्यांचे सीट कव्हर फाडले होते. त्यानंतर रात्री पुन्हा अशाच प्रकार घडलाय. वाहन तोडफोडीच अशीच एक घटना आज पहाटे उघडकीस आलीय पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने १2 वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. २) पहाटे अजंठानगर, चिंचवड येथे घडली. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सात ते आठ जणांचे टोळके अजंठानगर परिसरात आले. त्यांनी लाकडी दांडके, दगड तसेच इतर हत्यारांनी परिसरातील तेरा वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील एका आरोपीची ओळख पटलेली आहे. तो २०१७ मध्ये अजंठा नगर परिसरातून इतर ठिकाणी राहण्यास गेला आहे. पूर्ववैमनस्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अरेरे...ट्रकच्या धडकेत लाडक्या नातीसह आजीचा मृत्यू पिंपरी चिंचवड शहरात वारंवार वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. गेल्याच महिन्यात पिंपरी आणि काळेवाडी परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. टोळक्याकडून होणाऱ्या तोडफोडीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मद्यधुंद पोलिसाची गुंडगिरी, गुन्हेगारांना सोबत घेत 'बार' मालकाला मारहाण स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण होऊन दीड वर्ष तरीही गुन्हेगारी आटोक्यात नाही, पोलिसांचा वचक नाही शहरात राजरोस पणे सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू, वाहन चोरीच्या दररोज घडणाऱ्या घटना आणि शहरात मोकाट फिरणारे तडीपार गुंड ह्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना दुचाकी चारचाकी टेंपो ऑटो रिक्षा सामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाच साधन, अशा घटनात वाहनांच नौकास झाल्याने नोकरी व्यावसायाच्या ठिकाणी जायच कस , नुकसान भरपाईही लवकर मिळत नाही नागरिक हवालदिल
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Pune crime

    पुढील बातम्या