मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Weekend Lockdown वाढू शकतो; आठवडाभर असू शकतील कडक निर्बंध, उद्याच्या बैठकीत ठरणार फायनल

Weekend Lockdown वाढू शकतो; आठवडाभर असू शकतील कडक निर्बंध, उद्याच्या बैठकीत ठरणार फायनल

Weekend Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाउनचे निर्बंध आणखी काही दिवस कडक करण्याचा निर्णय होऊ शकतो.

मुंबई, 9 एप्रिल: शुक्रवार रात्री 8 वाजल्यापासून राज्यात (Weekned curfew in Maharashtra) कडक लॉकडाउनला सुरुवात होईल. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेत ठाकरे सरकारने (CM Uddhav Thackeray) Covid-19 निर्बंध कडक केले आहेत. शनिवार-रविवार (Weekend lockdown) अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद राहील. अत्यंत गरजेचं असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन सरकारतर्फे आधीच करण्यात आलं आहे. आता या लॉकडाउनची मुदत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे फक्त वीकएंडलाच नव्हे तर पुढचा आठवडाभर असे कडक निर्बंध लागू करण्याचा सरकार विचार करत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या (शनिवार 10 एप्रिल) दुपारी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  (Second wave of coronavirus) रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री सर्वपक्षिय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पुढील आठवड्यात सार्वजनिक सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून वीकेंड लॉकडाउनला सुरुवात होईल. पुढचे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहतील. पण वाहतुकीची साधनं जसे रेल्वे सेवा, बस, रिक्षा सुरू राहतील.

BIG NEWS : अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय

- हॉटेलमधून होम डिलिवरी सुरू राहील. पण हॉटेलमध्ये बसून खायला बंदी

-  विनाकारण बाहेर हिंडून नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

- मास्कशिवाय फिरणं, पाचपेक्षा अधिक जणांनी एकत्र येणं यावर बंदी. उल्लंघन केलं तर कठोर कारवाई.

लोकांचा जीव महत्त्वाचा, टीका करताय मदतही करा; महापौरांचा केंद्र सरकारला टोला

5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त राज्यात मिनी लॉकडाऊन (Mini lockdown) जाहीर करण्यात आला आहे. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Lockdown, Uddhav thackeray, Violation of curfew rules