• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BIG NEWS: अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय, नवी तारीख जाहीर होणार

BIG NEWS: अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय, नवी तारीख जाहीर होणार

राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी (MPSC exam postponed) अशी मागणी केली होती. दरम्यान आता याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे

  • Share this:
मुंबई, 9 एप्रिल: राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय (MPSC exam postponed) घेण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर अधिकारी यांची व्हीसीमार्फत बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. MPSC आयोग आगामी काळात कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन या परीक्षेची नवी तारीख जाहीर करणार आहे. राज ठाकरे यांनी केला होता मुख्यमंत्र्यांना फोन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधत MPSC परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली होती. 'कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दोन दिवसांनी होणाऱ्या MPSC परीक्षेबाबत राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी,' अशी विनंती राज ठाकरे यांनी फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. कॅबिनेट मंत्र्यांचाही होता विरोध राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसंच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा रद्द करून नव्याने नियोजन करावं, अशी मागणी केली होती.
Published by:Janhavi Bhatkar
First published: