मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आज बोहल्यावर चढणारच, प्रशासनाने परिसर केला सील; नवरदेवाची वरात पुन्हा घरात!

आज बोहल्यावर चढणारच, प्रशासनाने परिसर केला सील; नवरदेवाची वरात पुन्हा घरात!

लग्नसोहळ्याला जाण्यासाठी या कुटुंबाने प्रशासनाकडून रितसर परवानगीही घेतली  होती.

लग्नसोहळ्याला जाण्यासाठी या कुटुंबाने प्रशासनाकडून रितसर परवानगीही घेतली होती.

लग्नसोहळ्याला जाण्यासाठी या कुटुंबाने प्रशासनाकडून रितसर परवानगीही घेतली होती.

नरेंद्र मते,प्रतिनिधी

आर्वी, 29 जून : लग्न म्हणजे दोन जिवाचं मिलन, दोन कुटुंबांतील नव्या नात्याची सुरुवात असते. लॉकडाउनच्या काळात रखडलेल्या लग्न सोहळे अनलॉकमध्ये उरकण्याची धावपळ सुरू आहे. पण, नवरदेवचा परिसर सील केल्यामुळे वर्ध्यात एका कुटुंबावर लग्न सोहळा पुन्हा रद्द करण्याची नामुष्की आली.

वर्धा जिल्ह्यात तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळत आहे. त्यात आर्वी येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे आर्वी शहरातील जाजुवाडी भाग सिल करण्यात आला. याच परिसरात एका कुटुंबात आज नागपूर येथील युवतीसोबत विवाह  होणार होता. त्यासाठी या कुटुंबाने रितसर परवानगी घेतली  होती. त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी जाण्याची पूर्ण तयारी झाली होती. मात्र, नवरदेवाचे घर असणारा परिसर सिल केल्याने नवरदेवासह कुटुंब क्वारंटाइन करण्यात आले.

जगात पाऊल ठेवताच बाळाला कोरोनाने गाठले, आईलाही झाली लागण

ऐन लग्न सोहळ्याच्या दिवशीच नवरदेवाचे कुटुंबच क्वारंटाइन करण्यात आल्यामुळे या कुटुंबाला लग्न सोहळा रद्द करण्याची वेळ आली. याच परिसरातील बँकेतील 14 कर्मचाऱ्यांनाही  क्वारंटाइन करण्यात आले आहे.

जळगावमध्येही लग्नात नवरदेव नवरीला कोरोनाची लागण

दरम्यान, मागील आठवड्यात जळगावमध्ये नवरदेव  नवरीसह एकाच कुटुंबातील सोळा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आल्याने हनिमूनला फिरायला जाण्याऐवजी नवरदेव नवरीला कोरोनाच्या रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली.

14 जून रोजी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील विखरण या गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचा विवाह पार पडला होता. या विवाहाच्या दरम्यानच या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची किरकोळ लक्षणे आढळून आली होती. मात्र किरकोळ लक्षणे असल्याने त्याकडे कोणीही गंभीरतेने घेतले नाही.

सलग दुसऱ्या दिवशी समोर आली कोरोनाची मोठी आकडेवारी, वाचा लेटेस्ट अपडेट

मात्र, लग्नाच्या नंतर पाच-सहा दिवसांनी नवरदेवाची तब्येत खराब होऊ लागल्याने नवरदेवाची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत नवरदेव पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या जवळच्या नातेवाईकांची ही तपासणी करण्यात आली असता नवरी, फोटोग्राफर इत्यादीसह एकूण सोळा जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

या लग्नात 100 हुन अधिक इतरही वऱ्हाडी हजर असल्याचं समोर आले असून त्यांची ही तपासणी होण्याची शक्यता असून त्यात ही कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Corona