नवी दिल्ली, 29 जून : कोरोना रुग्णांची वाढती संख्या काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. दर दिवशी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सलग दुसर्या दिवशी कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणं समोर आली आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 2 लाख 10 हजार 120 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनामधून आतापर्यंत 16 हजार 475 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 3 लाख 21 हजार 722 रूग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे.
380 deaths and 19,459 new #COVID19 cases in last 24 hours. Positive cases in India stand at 5,48,318 including 2,10,120 active cases, 3,21,723 cured/discharged/migrated & 16,475 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/AzEwaXMKoT
— ANI (@ANI) June 29, 2020
कोरोना विषाणूचा सगळ्यात जास्त परिणाम हा महाराष्ट्र पाहायला मिळतो. राज्यात आतापर्यंत कोरोनाची 5 लाख 48 हजाराहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, रविवारी आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले आणि 24 तासांमध्ये तब्बल 5493 COVID- 19 रुग्णांची वाढ झाली. सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 64 हजार 626वर गेला. तर आज 156 जणांच्या मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7429 वर गेला.
60 मृत्यू गेल्या 48 तासातले आहेत तर उर्वरित मृत्यू मागील काही काळातले आहेत. राज्यात मृत्यू दर 4.51 टक्के आहे. मुंबईत रुग्णसंख्येने 28 हजारांचा आकडा पार केला आहे.
कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणे सलग दुसर्या दिवशी समोर आली आहेत. 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 रुग्ण मरण पावले. देशात कोरोनाची 5 लाख 48 हजार 318 प्रकरणे नोंदली गेली आहेत.
संकलन, संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus, Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus in india