जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update Today: बंगालच्या उपसागरात मोचा सक्रीय, 'या' राज्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update Today: बंगालच्या उपसागरात मोचा सक्रीय, 'या' राज्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट

हवामान अपडेट्स

हवामान अपडेट्स

ओडिसा प्रशासनाकडून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळ सक्रीय होत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यांमध्ये अलर्ट दिला आहे. वर्षातील पहिलंच चक्रीवादळ असून ओडिसा प्रशासनाकडून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यंदा उन्हाळ्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. एप्रिलनंतर आता मे महिन्यातही चक्रीवादळामुळे पाऊसच आहे. त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. सततच्या पावसामुळे आतापर्यंत तापमानाचा पारा सामान्यापेक्षा खालीच राहिला आहे. सोमवारीही दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस पडला, ज्यामुळे तापमान 20 अंश सेल्सिअसहून कमी होतं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 मे पर्यंत ढगांच्या गडगडाटासह पाऊस कायम असणार आहे. स्कायमेटच्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. यामुळे, हवेचा दाब 9 मे पर्यंत तीव्र होऊ शकतो आणि जवळजवळ उत्तरेकडे सरकणाऱ्या चक्री वादळात तीव्र होऊ शकतो.

मोचा चक्रीवादळाचा धोका, कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव?

१० मे पर्यंत हे वादळ बंगालच्या उपसागरावर सरकत ईशान्येकडे जाऊ शकते. या प्रक्रियेदरम्यान चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ येऊ शकते. बंगालमध्येही चक्रीवादळामुळे हाय अलर्ट देण्यात आला आहे.

Cyclone Mocha Interesting Facts : देशावर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाला मोचा हे नाव कसं पडलं?

तमिळनाडू, दक्षिण आणि किनारी कर्नाटक, केरळ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट देण्यात आला. याशिवाय ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, मध्य उत्तर प्रदेश, लक्षद्वीप, तेलंगणा, आंध्र प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात