मुंबई, 20 नोव्हेंबर : राज्यात पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान कमालीची घट झाली आहे. महाबळेश्वरमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे. तर वेण्णालेक परिसरात 6 अंशांची नोंद झाली आहे. धुळ्यातही तापमानात कमालीची घट झाली आहे. तर कोकणातील काही भाग सोडता थंडीची चाहुल लागली आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळाली आहे. राज्यात थंडी अचानक कमी झाल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात यंदा प्रथमच पारा 10 अशांखाली घसरला आहे हंगामातील नीचांकी 9.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात तापमान 8.2 अंशांवर गेल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुड भरली आहे. नाशिकमध्येही हुडहुडी भरण्यासारखी थंडी पडत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा : आला थंडीचा महिना, राज्याचं तापमान घसरलं, पुढचे काही दिवस काळजी घ्या!
तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्याने पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात धुके साचल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढचे चार दिवस थंडी असल्याचे सांगण्यात आले आहे.
नाशिकचा पारा घसरला
अनेक दिवस रेंगाळलेल्या पावसानंतर नशिकमध्ये थंडीचे आगमन झालंय. गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरतोय नाशिकचे तपामन तीन दिवसांत 13 अंश सेल्सिअसवरून 10.4 अंशापर्यंत खाली घसरले आहे. तर निफाडमध्ये 8.1 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. व्यायाम शाळा जिम, जॉगिंग ट्रॅक हळूहळू गर्दीने फुलून जात असताना गोदा काठावर मात्र सकाळी रेलचेल कमी दिसत आहे.
मंदिरांच्या अवती भवती पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर, त्या अडून गोदावरीच्या पाण्यात डोकावणारी सूर्य किरण, त्यामुळे गोदेच्या पाण्याला जणू सोन्याचा मुलामा दिला आहे की काय असा भास होत आहे. पर्यटकही या थंडीचा आनंद घेत आहेत. एखाद्या चित्रकाराने आपल्या कल्पनेतील चित्र रेखाटावे असे दृश्य सध्या गोदा काठावर दिसत आहे.
हे ही वाचा : थंडी वाढली, खराब हवामानामुळे मुंबईसह दिल्लीकरांना फटका, श्वसनाच्या त्रासात वाढ
महाबळेश्वरात तापमान 8 अंशांवर पोहोचले आहे. तर वेण्णालेक 6 अंशांवर घसरले. परभणीत यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. परभणीत तापमान 8.3 अंशांवर पोहोचलंय. नाशिकमध्येही हुडहुडी भरलेय. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्यानं पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे.
महाबळेश्वरातील तापमानात आणखी घट
महाबळेश्वरातील तापमानात आणखी घट झाली असून महाबळेश्वरातील तापमान 8 अंशावर तर वेण्णालेक 6 अंशावर गेले आहे. मात्र दवबिंदू गोठले नाहीत. घसरलेल्या तापमानामुळे महाबळेश्वरवासीय आणि पर्यटक चांगलेच गारठले