जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Winter Update : आला थंडीचा महिना, राज्याचं तापमान घसरलं, पुढचे काही दिवस काळजी घ्या!

Maharashtra Winter Update : आला थंडीचा महिना, राज्याचं तापमान घसरलं, पुढचे काही दिवस काळजी घ्या!

Maharashtra Winter Update : आला थंडीचा महिना, राज्याचं तापमान घसरलं, पुढचे काही दिवस काळजी घ्या!

पावसाने थैमान घातल्यानंतर काही अंशी वातावरणात गारवा येत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 नोव्हेंबर : मागच्या चार महिन्यांपासून पावसाने थैमान घातल्यानंतर काही अंशी वातावरणात गारवा येत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात 15 अंशांच्या खाली नोंद झाली आहे. दरम्यान राज्यातून पाऊस गेल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात घट होऊ लागली आहे. ही स्थिती पुढील तीन दिवस राज्यात अशीच कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

जाहिरात

राज्यातील मुंबई उपनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळेसह राज्यातील काही भागात दोन दिवसात नीचांकी तापमानाची नोंद झाली. तर नगर जिल्ह्यात 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 1 ते 2 अंशांनी घट झाली आहे. ही स्थिती पुढील तीन दिवस राहून त्यानंतर गारठा पुन्हा काहीसा कमी होण्याचे संकेत आहेत.

हे ही वाचा :  यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी देणार दांडी, पाऊस पुन्हा थैमान घालणार?

दरम्यान राज्यातील बऱ्याच ठिकाणी रात्रीपासून कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याचे  दिसून येत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्यात 2 ते 3 अंशांनी किमान तापमानात घट होऊ शकते.

राज्यात पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान कमालीची घट झाली आहे. महाबळेश्वरमध्ये तापमान 10.4 अंशांवर गेल्याची नोंद झाली. तर वेण्णालेक परिसरात  6 अंशांची नोंद झाली आहे. धुळ्यातही तापमानात कमालीची घट झाली आहे.

जाहिरात

तर कोकणातील काही भाग सोडता  कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. धुळ्यात तापमान 8.2 अंशांवर गेल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुड भरली आहे. नाशिकमध्येही हुडहुडी भरण्यासारखी थंडी पडत असल्याचे दिसून येत आहे. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्याने पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे.

जाहिरात

नाशिकचा पारा घसरला

अनेक दिवस रेंगाळलेल्या पावसानंतर नशिकमध्ये थंडीचे आगमन झालंय. गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरतोय नाशिकचे तपामन तीन दिवसांत 13 अंश सेल्सिअसवरून 10.4 अंशापर्यंत खाली घसरले आहे.  तर निफाडमध्ये 8.1 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  व्यायाम शाळा जिम, जॉगिंग ट्रॅक हळूहळू गर्दीने फुलून जात असताना गोदा काठावर मात्र सकाळी रेलचेल कमी दिसत आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  थंडी वाढली, खराब हवामानामुळे मुंबईसह दिल्लीकरांना फटका, श्वसनाच्या त्रासात वाढ

मंदिरांच्या अवती भवती पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर, त्या अडून गोदावरीच्या पाण्यात डोकावणारी सूर्य किरण, त्यामुळे गोदेच्या पाण्याला जणू सोन्याचा मुलामा दिला आहे की काय असा भास होत आहे. पर्यटकही या थंडीचा आनंद घेत आहेत.  एखाद्या चित्रकाराने आपल्या कल्पनेतील चित्र रेखाटावे असे दृश्य सध्या गोदा काठावर दिसत आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात