मुंबई, 27 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना संपत असतानाच हवामानाने लहर बदलल्याची जाणीव तीव्र होणार आहे. गेले काही दिवस राज्यात कमाल तापमानात वाढ होत आहे. आता उन्हाळा तीव्र होण्याची लक्षणं दिसत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढच्या दोन दिवसात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. राज्यभरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार आहे. त्याच वेळी राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चसाठी हा अलर्ट आहे. कुठे वाढणार उन्हाचा चटका भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन दिवस राज्यभर किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्शिअसने वाढणार आहे. कमाल तापमानसुद्धा पुढच्या 48 तासांत चढेच राहणार असल्यामुळे उन्हाळ्याची जाणीव तीव्र होईल. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल आणि किमान तापमानातसुद्धा 3 अंशांपर्यंत वाढ होईल. याचा अर्थ रात्रीच्या वेळी आणि पहाटे जाणवणारा सुखद गारवाही पुढच्या काही दिवसात अनुभवता येणार नाही. कुठे पडणार पाऊस एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतान विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकणी 29 फेब्रुवारीपासून दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यातही गोंदिया आणि पूर्व विदर्भात गारपीट झाली होती. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. विदर्भात ऑरेंज अलर्ट 29 फेब्रुवारीला विदर्भात काही ठिकाणी गडगडासह वादळी पाऊस पडू शकतो. वेधशाळेने या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 1 मार्चलाही हवामान ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. अन्य बातम्या श्वासनलिकेत अडकला शेंगदाणा, अडीच वर्षांच्या सृष्टीचा गुदमरून मृत्यू मराठी दिनी राज ठाकरे यांनी शेअर केला काश्मिरी तरुणीचा VIDEO वाट चुकलेल्या महिलेवर दोन तासांमध्ये 3 नराधमांनी केला बलात्कार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.