मुंबई, 28 जुलै : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची गैरहजरी आहे. पण आता श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा कमबॅक होणार आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी आता पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे. पण पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. तर पुढच्या 24 ते 48 तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 48 तासात मराठवाडा व इतर शहरांमध्ये मध्यम/जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोरोनासोबत वाढला आणखी एका संसर्गाचा धोका, या जिल्ह्यात वाढली रुग्णसंख्या
गेल्या 24 तासात, मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस. ढगाळ आकाश. पुढच्या 24,48 तासात, मुंबई, ठाणे मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता. पुढच्या 48 तासात मराठवाडा व interiors मध्यम/जोरदार पावसाची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 28, 2020
1ऑगस्ट पासून कोकणात जोरदार पाऊस असण्याची शक्यता,मुंबई ठाणे, NM सह.
Will update pic.twitter.com/MbVDrBUDza
मुंबई, ठाणे, पुण्यासह 1 ऑगस्टपासून कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या हिमालय पर्वत रांगांजवळ द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण उत्तर भारत, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात 29 ते 31 जुलै दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात लवकरच येणार नवा सातबारा, सुटसुटीत करण्यासाठी करणार तब्बल 11 बदल हवामान खात्याने (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सादर केलेल्या बुलेटिनमध्ये आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत 1 कोटीचं घर 30 लाखांत मिळणार, ठाकरे सरकारने आखला मोठा प्लान दरम्यान, सोमवारी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान यासारख्या राज्यांसह उत्तर भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.