जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli : लाट आली अन् दोघांना समुद्रात घेऊन गेली, 'त्या' व्हायरल व्हिडीओतील माणसं सांगलीची, LIVE VIDEO

Sangli : लाट आली अन् दोघांना समुद्रात घेऊन गेली, 'त्या' व्हायरल व्हिडीओतील माणसं सांगलीची, LIVE VIDEO

Sangli : लाट आली अन् दोघांना समुद्रात घेऊन गेली, 'त्या' व्हायरल व्हिडीओतील माणसं सांगलीची, LIVE VIDEO

सांगलीचे तिघेजण ओमान देशात वाहून गेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेजन वाहून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. (sangli viral video)

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 13 जुलै : सांगली जिल्ह्याच्या (sangli) जत (sangli district jat tehsil) तालुक्यातील तिघेजण ओमान देशात समुद्राच्या (oman country sea) लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती व सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले. (sangli viral video) दरम्यान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेजन वाहून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमध्ये (live video) असलेले वाहून गेलेले दोघेजन सांगलीचे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांच्यासोबत त्यांचे वडील वाहून गेले आहेत.

जाहिरात

मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील कित्येक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मयत शशिकांत, पत्नी, मुले व मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

हे ही वाचा :  कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट, आता पेट्रोल-डिझेलही स्वस्त होणार?

दुबई येथे वास्तव्यास असलेले व मूळचे जत  विजय सिद्राम म्हमाणे (वय 45), त्यांची मुलगी श्रुती (वय 9) व मुलगा श्रेयस (वय 6) या तिघांचा ओमान येथील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवार, दि. 10 रोजी ही घटना घडली असून या घटनेमुळे जत शहरावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात
जाहिरात

शशिकांत म्हमाणे हे गेल्या काही वर्षांपासून दुबईतील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. रविवारी सुट्टी असल्याने ते आपल्या कुटुंबियांसह ओमान येथील समुद्रकिनारी सहलीसाठी गेले होते. समुद्राच्या पाण्यात मुले खेळत असताना अचानक लाट उसळली आणि शशिकांत यांची मुलगी श्रेया व मुलगा श्रेयस त्यात खेचले गेले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना शशिकांत हेदेखील लाटेच्या प्रवाहाबरोबर समुद्रात खेचले गेले आणि मुलांसह बेपत्ता झाले. दोन दिवसांच्या तपासानंतर मुलगा व वडिलांचा मृतदेह सापडला. मात्र, मुलीचा शोध लागला नाही.

जाहिरात

हे ही वाचा :  राज्यात पावसाची संततधार सुरुच, पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; अनेक नद्यांना पूर

शशिकांत हे जत येथील प्रसिद्ध वकील राजू सिद्राम म्हमाणे यांचे बंधू होते. शशिकांत यांच्याबरोबर जतमधीलच बाळासाहेब भारत यादव हे सुद्धा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यादव हेही या सहलीच्यावेळी आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते. ही सर्व घटना शशिकांत यांच्या पत्नी सारिका म्हमाणे (वय 33 ) यांच्यासमोर घडल्याने त्यांची शुद्ध हरपली. पण पुढील तपशील मिळू शकला नाही.

जाहिरात

निवृत्त शिक्षक सिद्राम म्हमाणे यांना एकूण तीन मुले एक वकील, एक अभियंता आणि एक मुलगी पंढरपूर येथे शासकीय सेवेत आहे. शशिकांत म्हमाणे हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दुबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे बंधू राजू म्हमाणे जत येथील शिवनगर येथे वास्तव्यास आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात