मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'पंढरी शेठ फडके विहिघर वाला..'ची किक्रेट मैदानात गोळीबार करत एंट्री अन् उधळल्या नोटा, पाहा हा VIDEO

'पंढरी शेठ फडके विहिघर वाला..'ची किक्रेट मैदानात गोळीबार करत एंट्री अन् उधळल्या नोटा, पाहा हा VIDEO


पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते आहे. मध्यतंरी त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्या दाखल करण्यात आला होता.

पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते आहे. मध्यतंरी त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्या दाखल करण्यात आला होता.

पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते आहे. मध्यतंरी त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्या दाखल करण्यात आला होता.

नवी मुंबई, 21 फेब्रुवारी : नवी मुंबईतील पनवेलमध्ये स्थानिक क्रिकेटचे सामन्यात पंढरीनाथ फडके याने भर मैदानात हवेत गोळीबार करत एंट्री केल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नाहीतर त्याच्या एंट्रीवर नोटांची उधळणही करण्यात येत होती.

नवी मुंबईतील पनवेलमधील विहिंगर गावातील रात्रीचे क्रिकेट सामने भरवण्यात आले आहे. हे सामने सुरू होण्याआधी पंढरीनाथ फडके याने आपल्या समर्थकांसह एंट्री केली.  त्यावेळी 'बीएमडब्ल्यू घेऊन आला पंढरी शेठ फडके विहिघर वाला बिनजोड छकडेवाला' हे गाणं डिजेवर जोरात वाजवण्यात आलं. मग काय पंढरी शेठ एकदम रंगात आले आणि त्यांनी

आपल्याकडील असलेल्या पिस्तुलीतून हवेत गोळीबार केला. जसे जसे पंढरी फडके पुढे जात होते तसं तसं ते गोळीबार करते होते. एकूण 4 राऊड त्यांनी हवेत फायर केले. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकाने त्यांच्यावर नोटाही उधळल्या.

पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते आहे. मध्यतंरी त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्या दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याने भाजपशी हातमिळवणी केली. मात्र, फडके आपली दहशत कायम ठेवून आहेत. या प्रकरणी फडके याला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  खारघर पोलिसांकडून नवी मुंबई गुन्हेशाखेनं फडके याला आपल्या ताब्यात घेतल्याचं सूत्राचं म्हणणं आहे.

...आणि जेव्हा ATM बाहेर 77 वर्षीय आजोबा आणि चोरामध्ये रंगली WWF

रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या भुरट्या चोरांचा सुळसुळाट भारतातच नाही तर भारताबाहेरही आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 77 वर्षांच्या आजोबांनी एटीएममधून पैसे काढल्यानंतर त्यांना लुटण्यासाठी आलेल्या चोरासोबत त्यांनी दोन हात करत चोराला पळता भुई थोडी केली आहे. या 77 वर्षांच्या वृद्ध आजोबांनी चोराला चांगलाच इंगा दाखवला आणि चोराला हुसकवून लावलं. वृद्ध असल्याचा फायदा घेऊन हा चोर त्यांना लुटण्यासाठी आला होता खरा मात्र त्याच चोरावर पळून जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावर युझर्सकडून या 77 वर्षीय आजोबांचं कौतुक होत आहे.

हेही वाचा-फटाक्यांमुळे स्टेजवर गायकाच्या केसाला लागली आग, पुढे काय झालं पाहा VIDEO

इंग्लंडमध्ये रात्रीच्या वेळी 77 वर्षांचे वृद्ध आजोबा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढून निघत असताना त्यांना चोरानं अडवलं. त्यांचे पैसे काढून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला मात्र अजोबांच्या जुडो आणि तुफान मारहाणीसमोर चोराचा टिकाव काही लागू शकला नाही. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर 1.2 हजार लोकांनी या व्हिडिओवर फेसबुकला रिअॅक्ट केलं आहे. 600 हून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. 77 वर्षांच्या या वृद्ध आजोबांच्या धाडसाचं कौतुक कराल तेवढं थोडं आहे. न डगमगता त्यांनी चोराला पळवून लावलं.

हेही वाचा-बॉस असावा तर असा! कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत CEO नी केला डान्स, पाहा VIDEO

हेही वाचा-Video: अ‍ॅनिव्हर्सरीला बनवला 'मृतदेहाचा केक', चाकूने कापून लोकांमध्येही वाटला

First published:
top videos