VIDEO: फटाक्यांमुळे स्टेजवर गायकाच्या केसाला लागली आग, पण झालं असं की सगळ्यांनी केलं पॉप सिंगरचं कौतुक

VIDEO: फटाक्यांमुळे स्टेजवर गायकाच्या केसाला लागली आग, पण झालं असं की सगळ्यांनी केलं पॉप सिंगरचं कौतुक

केसाला लागली आग तरी सोडलं नाही गाणं, हिप पॉप सिंगरचा VIDEO VIRAL

  • Share this:

डेट्राइट, 20 फेब्रुवारी : स्टेज शोमधील कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा फटाक्यांची आतषबाजी किंवा स्टेजवर आतषबाजी केली जाते. या आतषबाजी एका तरुणाच्या जीवावर बेतली असती मात्र थोडक्यात त्याचा जीव बचावला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील लोआ इथल्या एका स्टेज शो दरम्यान गायकाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी आतषबाजी करण्यात आली. त्यातील एक ठिणगी ही थेट गायकाच्या केसांवर उडाली आणि आग लागली. ही दुर्घटना घडली तरीही गायकानं आपला टेम्पो न सोडता गात राहिला मात्र श्रोत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. स्टेजवरील इतर सहकारी धावून आली आणि त्यांनी काही क्षणात ही आग विझवली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ह्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा-बॉस असावा तर असा! कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत CEO नी केला डान्स, पाहा VIDEO

ही संपूर्ण घटना लोआ इथल्या डेट्रोइट रॉक सिटी इथे एक कॉन्सर्टमध्ये पाहायला मिळाली. हिप हॉप सिंगर बॉबी जेनसन त्यांच्या बँड टीम सोबत शो करत होते. त्यावेळी स्टेजवर झालेल्या आतषबाजीतील एक ठिणगी बॉबी जेनसन यांच्या केसात उडाली आणि त्यांच्या केसांना आग लागली. त्याच वेळी सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत ही आग विझवली आणि मोठा अनर्थ टळला. त्यावेळी श्रोत्यांच्या काळजात धस्स झालं होतं. मात्र क्षणासाठी अनर्थ टळल्यानं पुन्हा एकदा श्रोत्यांनी चिअरप केलं शोमध्ये जोश आला. घटनेनंतर गायकाचं धाडस आणि परफॉर्मन्स पाहून सर्वांनी त्याचं कौतुक केलं आहे.

केसांना आग लागल्यानंतरही सिंगर बॉबी जेनसन यांनी आपलं गाणं सोडलं नाही. ते तेवढ्याच उत्साहानं गात होते. 'मी गाण्यात इतका तल्लीनं झालो होतो की मला माहीतच नव्हतं माझ्या केसांना आग लागली आहे' असं जेनसन यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युझर्सना सांगितलं आहे.

हेही वाचा-चिकन खाल्यामुळे कोरोनो होतो अशी अफवा पसरवून फसले, राज्य सरकारने दिला झटका

First published: February 20, 2020, 12:50 PM IST

ताज्या बातम्या