Home /News /viral /

बॉस असावा तर असा! कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत CEO नी केला डान्स, पाहा VIDEO

बॉस असावा तर असा! कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत CEO नी केला डान्स, पाहा VIDEO

'स्ट्रीट डान्सर 3डी' सिनेमातील मुकाबला या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्यासोबत ऑफिसमधील इतर सर्व कर्मचारी डान्स करतात.

    मुंबई, 19 फेब्रुवारी : एखाद्या कंपनीच्या ऑफीसमध्ये म्युझिक, डान्स सुरु असल्याचं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण वेल्सपन इंडिया लिमिटटेड कंपनीच्या ऑफीसमध्ये असं दृश्य बघायला मिळालं. यातही डान्स करणारी व्यक्ती कंपनीच्या सीईओ होती. दीपाली गोयंका यांनी कंपनीच्या ऑफीसमध्ये केलेला डान्सचं कौतुक सोशल मीडियावर केलं जात आहे. त्यांनी ऑफिसमध्ये बॉलीवूड सॉन्गवर डान्स केला. दीपाली गोयंका यांचा हा डान्स ट्विटरवर आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे. यात दीपाली यांचे कौतुक केलं आहे. दीपाली यांनी 'स्ट्रीट डान्सर 3डी' सिनेमातील मुकाबला या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्यासोबत ऑफिसमधील इतर सर्व कर्मचारी डान्स करतात. ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे. हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, ऑफिसमध्ये कोणत्याही सीईओला डान्स करताना पाहणं दुर्मीळ आहे. ऑफिसचं वातावरण चांगलं ठेवण्याचा हाच एक चांगला मार्ग आहे. दीपाली गोयंका यांनी रिट्विट करताना म्हटलं की हर्ष गोयंका व्हिडिओ शेअर करण्यासाठी आभारी आहे. आनंद महिंद्रा, गौतम अदानी, किरण शॉ मला तुमचे ऑफिसही असेच बघायला आवडेल असं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओचं कौतुक केलं जात आहे. ऑफिसमध्ये असंच वातावरण असायला हवं असं म्हटलं जात आहे. 'देश हम सबको चलाना है...', रतन टाटांनी शेअर केला नव्या मिशनचा हृदयस्पर्शी VIDEO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Tweeter

    पुढील बातम्या