मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha News: विमा काढला अन् पाचव्या दिवशी झालं निधन, 399 रुपयांच्या विम्यानं कुटुंबाला मिळाले 10 लाख रुपये! Video

Wardha News: विमा काढला अन् पाचव्या दिवशी झालं निधन, 399 रुपयांच्या विम्यानं कुटुंबाला मिळाले 10 लाख रुपये! Video

X
Wardha

Wardha News: विमा काढला अन् पाचव्या दिवशी झालं निधन, 399 रुपयांच्या विम्यानं कुटुंबाला मिळाले 10 लाख रुपये! Video

वर्ध्यातील सुरेश पाटील यांनी 399 रुपयांचा पोस्टाचा विमा काढला आणि त्यांचं पाचव्याच दिवशी निधन झालं. मोठी रक्कम मिळाल्यानं कुटुंब सावरलं आहे.

अमिता शिंदे, प्रतिनिधी

वर्धा, 25 मे: जन्मानंतर मृत्यू ठरला आहे मात्र मृत्यूनंतर कुटुंबीयांचं भलं करणं सर्वांनाच जमतं असं नाही. मात्र वर्ध्यात पोस्ट विभागाची विमा योजना एका कुटुंबाला लॉटरीच ठरली आहे. सुरेश हरिदास पाटील वय 56 वर्षे यांनी पोस्ट कार्यालयाचा केवळ 399 रुपयांचा विमा काढला. विमा काढल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच त्यांचं अपघाती निधन झालं. मात्र त्यांच्या निधनानंतर या विम्याने त्यांच्या कुटुंबीयांना लखपती बनवलं आहे. नुकताच त्यांच्या कुटुंबीयांना तब्बल दहा लाखांचा धनादेश पोस्ट विभागाकडून सुपूर्द करण्यात आला आहे.

केवळ 399 पासून 10 लाखांचा लाभ

पाटील यांना एका व्यक्तीने पोस्टाच्या पॉलिसीबाबत सांगितले. त्यानुसार 29 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांनी भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारा टाटा आयएजीची एक्सीडेंट गार्ड पॉलिसी केवळ 399 मध्ये डाक विभागाच्या माध्यमातून काढली. ही पॉलिसी वार्षिक असल्यामुळे एक वेळाच 399 रुपये अदा करायचे होते. मात्र पॉलिसी काढल्यानंतर पाचव्याच दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर 2022 ला रस्ता अपघातात सुरेश यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक मृत्यूमुळं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

पॉलिसी आठवली आणि केला पाठपुरावा

सुरेश यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी कुटुंबीयांना त्यांची डाक विभागाची पॉलिसी आठवली. दुखद घटनेतून सावरत फेब्रुवारी महिन्यात विमा रकमेसाठी कुटुंबीयांनी क्लेम केला. त्याचा पाठपुरावा केला. त्यावर डाक अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पोस्ट कार्यालयाने पूर्ण माहिती घेऊन प्रक्रिया पुढे नेली.

3 वेळा मृत्यू हरवलं, आता आयुष्याची कमाई दिली कॅन्सर रुग्णालयाला दान! Video

अडीच महिन्यांत प्रक्रिया पूर्ण

पाटील यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी फेब्रुवारी महिन्यात डाक विभागाशी संपर्क केला. अवघ्या अडीच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली असून दहा लाखांचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी धनादेश स्वीकारला.

First published:
top videos

    Tags: Local18, Wardha, Wardha news