मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nagpur News: 3 वेळा मृत्यू हरवलं, आता आयुष्याची कमाई दिली कॅन्सर रुग्णालयाला दान! Video

Nagpur News: 3 वेळा मृत्यू हरवलं, आता आयुष्याची कमाई दिली कॅन्सर रुग्णालयाला दान! Video

X
Nagpur

Nagpur News: 3 वेळा मृत्यू हरवलं, आता आयुष्याची कमाई दिली कॅन्सर रुग्णालयाला दान! Video

नागपुरातील निलेश साठे यांनी दातृत्वाचं अनोखं उदाहरण घालून दिलंय. त्यांनी आयुष्यभराची कोटींची कमाई कॅन्सर रुग्णालयाला दान केलीय.

विशाल देवकर, प्रतिनिधी

नागपूर, 24 मे: आयुष्यभर नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यावर कमावलेल्या जमापुंजीमध्ये सुखानं उर्वरित आयुष्य जगावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र समाजाने आपल्याला भरभरून दिलं, त्याच समाजाचं आपण देखील काही देणं लागतो, ही उदात्त भावना फार थोड्या लोकांमध्ये बघायला मिळते. अशाच दातृत्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपुरातील 66 वर्षीय निलेश साठे होय. LIC चे माजी कार्यकारी संचालक असणाऱ्या साठे यांनी तब्बल तीन वेळा कर्करोगासारख्या आजारावर मात केली. या जीवघेण्या आजारवर गोरगरिबांनाही उपचार मिळावेत या उद्देशानं त्यांनी नागपुरात नव्याने झालेल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेला तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

कॅन्सरमुळेच झालं आईचं निधन

निलेश साठे हे भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये (LIC) कार्यकारी संचालक होते. तसेच ते विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) पूर्णवेळ सदस्य होते. त्यांनी आपल्या निवृत्तीनंतर कोट्यवधींची पुंजी कॅन्सर संस्थेला देण्याचा निर्णय घेतला. त्याची काही कारणंही आहे. साठे सांगतात की, "1972 मध्ये आमच्या आईंना कर्करोगाचं निदान झालं. त्यावेळी नागपुरात उपचारच नव्हते. त्यामुळं आम्ही मुंबई येथे टाटा मेमेरियल कॅन्सर हॉस्पिटलला घेऊन घेलो. आई त्यातून बरी झाली मात्र 2005 साली परत तिला कॅन्सर असल्याचे निदान झाले. मात्र ते उशिरा कळल्याने त्यात तिचे निधन झाले."

साठे यांनी तीनदा कॅन्सरवर केली मात

साठे पुढं सांगतात की, 2005 ला आई गेली आणि 2012 साली मला कॅन्सर झाला. त्यात मी मुंबईला उपचार घेतले. त्यानंतर वर्षभरात पुन्हा यकृतावर कॅन्सरचे विषाणू दिसले. म्हणून यकृताचा 30 टक्के भाग काढून टाकला. मग त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किमो घ्यावा लागला. त्यात 6 सिरीज किमो घेतल्या पण एवढे होऊन देखील पुन्हा दोन सेगमेंट वर आजार बळावला आणि पुन्हा 2014 मध्ये 30 टक्के लिवर काढावा लागला. तीन वर्ष मी या आजारांवर मात करत सुखरूप बाहेर पडलो आहे. आज मी कॅन्सार मुक्त झालो. आज मी आरामात जीवन जगत आहे. या सगळ्या प्रवासात मला जाणीव झाली होती म्हणून इतर कुठे दान देण्याऐवजी नागपुरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सरला दान देण्याचे ठरवले आणि ठरवल्या प्रमाणे दिले सुद्धा."

सेवानिवृत्तीनंतरचं उत्पन्न दान करण्याचा निर्णय

आपण उधारी करून किंवा कर्ज काढून कुणाला दान करत नसतो. आपल्याकडे असलेल्या गोष्टी मधूनच आपण कुणाला मदत करत असतो. दारात पाहुणा आला की ताटातलं त्याला द्यायची आपली संस्कृती आहे. तसे आपल्यावर लहानपणापासूनच संस्कार झालेले असतात. एक कोटी रक्कम ही फार मोठी वाटते. आयुष्यभर नोकरी केलेला माणूस आयुष्याच्या उत्तरार्धातील परिस्थितीत कोणाला दान देऊ शकेल? तेही वयाच्या 66 व्या वर्षी. हे थोड अगम्य वाटतं. मात्र मी जेव्हा IRDA मधून सेवानिवृत्त झालो त्यानतंर मी विचार केला की या पुढे आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे ते आपले नाही.

UPSC Success Story : आई विडी कामगार तर वडील शेतकरी, हार न मानता मंगेशनं अखेर करून दाखवलं, पाहा Video

..हे उत्पन्न आपलं नाही

सामान्यतः सेवानिवृत्त झाले की आपली पेन्शन किंवा जी जमापुंजी असते किंवा त्यावरचे व्याज यावर गुजराण होते. मात्र आपल्याला इथून पुढे जे आपले शिक्षण आहे, अनुभव आहे, त्या जोरावर मी भविष्यात मोठ्या मोठ्या नामवंत कंपनी साठी काम करतो आहे. त्यापुढे मला जे नंतर उत्पन्न मिळेल ते सेवा निवृत्ती नंतर मिळणार आहे. त्यावेळी मी ठरवलं की हे उत्पन्न सामान्यतः इतर फार कुणाला मिळत नाही. तर हे आपले उत्पन्न नाही. त्यामुळे ही रक्कम बाजूला काढूया आणि समाजासाठी दान करूया. नागपुरात नुकताच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ही संस्था लहान मुलांना काहीही पैसा न घेता त्यांना कॅन्सर सारख्या आजारावर उपचार देते. या संस्थेसाठी लागणारा पैसा डोनेशन मधून येतो म्हणून या ठिकाणी पैसे दान केले, असे साठे सांगतात.

First published:
top videos

    Tags: Cancer, Health, Local18, Nagpur, Nagpur News