अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 2 जून: दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2023) हा नुकताच जाहीर झालाय. या परीक्षेत मागील काही वर्षांची परंपरा कायम आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत सर्वात जास्त लागला आहे. यावर्षी पुन्हा एकदा मुलींनी हुश्शार असल्याचं दाखवून दिलं आहे. मुलींची टक्केवारी 95.87 तर मुलांची टक्केवारी 92.5 इतकी आहे म्हणजेच 3.82 ने कमी झालाय. काही दिवसांपूर्वी लागलेल्या बारावीच्या निकालातही मुलींनी मुलींनी प्रतिकुल परिस्थितीत यश मिळवलं होतं. छत्तीसगडमधील एका पंक्चरचं दुकान चालवून संसाराचा गाडा हाकणाऱ्यानं मुलीला शिक्षणासाठी महाराष्ट्रात मावशीकडे पाठवलं. परवीन रजा अली उर्फ निलू हिनं आई-वडिलांचा आणि मावशीचा विश्वास सार्थ ठरवला. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. मुळची हिंदी भाषिक असूनही मराठी महाविद्यालयात शिक्षण घेत विज्ञान शाखेतून 90 टक्के गुण मिळवणाऱ्या निलूवर शुभेच्छाचा वर्षाव होतोय. बिहारची निलू मावशीकडे वर्ध्यात निलूच्या वडिलांचं मुळ गाव बिहारमधील मडुवाहा आहे. छत्तीसगडच्या रायपूर येथे त्यांचं पंक्चरचं दुकान आहे. घरची आर्थिक स्थिती हालाकिची असल्यानं शिक्षण शक्य नव्हतं. दहावीपर्यंतचं शिक्षण रायपूरमध्ये घेतल्यानंतर ती वर्धा जिल्ह्यातील इंदरमारी येथे मावशीकडे आली. आष्टीतील हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महविद्यालयात प्रवेश घेतला. जिद्द आणि चिकाटीनं अभ्यास करून तिनं बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेत विज्ञान शाखेतून 90 टक्के गुण मिळवत निलूनं आष्टी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
कोणतीही शिकवणी न लावता यश निलूची आई गृहिणी आहे. निलूला तीन बहिणी असून दोन मोठ्या बहिणी विवाहित आहेत. लहान बहीण आठवीत शिकतेय. घरची परिस्थिती बेताची असूनही तिने परिस्थितीवर रडत न बसता शिक्षण घेण्याचा निश्चय केला. कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता घरीच अभ्यास केला. शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनावर बारावीच्या विज्ञान शाखेत 90.17 टक्के गुण मिळविले आहेत. बारावीच्या परीक्षेत युट्युबची साथ निलू रायपूर येथील असल्यामुळे तिला वर्धा येथे मराठी भाषा समजून घेण्यास अडचणी येत होत्या. मात्र युट्युबच्या माध्यमातून तिने स्वतःच्या अडचणी आणि प्रश्न सोडवले. बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून हिंदी भाषिक निलूसाठी शिक्षण अवघड होतं. पण इंदरमारी सारख्या ग्रामीण भागात एकाही विषयाची शिकवणी नसताना युट्युब आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तिला हे यश लाभल्याचं निलू सांगते. सलाम तिच्या जिद्दीला! घर, नोकरी सांभाळून 38 व्या वर्षी बारावी पास, Video भविष्यात इंजिनियर होण्याचं स्वप्न निलू ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे शिक्षकांची लाडकी आहे. दहावीतही तिने चांगले मार्क्स घेऊन चमक दाखवली होती. बारावीच्या परीक्षेतही तिचे यश कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे आहे. निलूचं भविष्यात इंजिनिअर होण्याचं स्वप्न आहे. मेहनतीच्या बळावर निलू भविष्यात अशीच उत्तुंग भरारी घेईल याच सदिच्छा.