अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 19 जून : दहावी -बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी नव्या शैक्षणिक वाटेवर प्रवास करतात. आपण भविष्यात कुठं शिक्षण घ्यावं? कोणता कोर्स करावा? हे प्रश्न त्यांना सतावत असतात. सर्वसामान्य विद्यार्थी त्यांची स्वप्न सत्यात उतरवू शकतात. पण, मूकबधिर विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र हे विचार अनेकदा विचारच राहून जातात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वर्ध्यात आता हे विद्यार्थी देखील आपल्या करिअरसाठी वेगवेगळे कोर्स करत आहेत. टॅली, ॲडव्हान्स एक्सल, डीटीपी, फोटोशोप, टायपिंग, एम एस सी आय टी अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण कोर्सेस हे विद्यार्थी अतिशय मन लावून करताना दिसून येत आहेत..वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्प्युटर क्लासेस करण्याकडे या विद्यार्थ्यांचा कल दिसून येतोय.
प्रशिक्षकांना होतं आव्हान या विद्यार्थ्यांना शिकवणे हे प्रशिक्षकांना देखील आव्हान होतं. विद्यार्थ्यांची सांकेतिक भाषा प्रशिक्षकांसाठी नवी होती. त्यावेळी प्रशिक्षकांनी यूट्यूबच्या माध्यमातून ही भाषा शिकली. विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधत प्रशिक्षकांनी ही भाषा शिकून घेतली. लग्न झाल्यानंतर पॅरालिसिसनं गाठलं, मुरमुरे विकले आणि लेकरांना केलं मोठं, VIDEO ‘आम्ही मूकबधिर असलो म्हणून काय झालं? आम्ही देखील सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण घेऊन आमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. अन्य विद्यार्थ्यांनीही अपंगत्वामुळे खचून न जाता जिद्दीनं अभ्यास करावा. स्वयंरोजगार मिळतील असे कोर्सेस शिकून करिअरमध्ये उंच भरारी घ्यावी, असं आवाहन या विद्यार्थ्यांनी केलंय. या विद्यार्थ्यांनाही स्वत:चं भविष्य घडवायचं आहे. सरकारी क्षेत्रात नोकरी करायची आहे. त्यासाठी हे कोर्सेस त्यांच्या उपयोगात येऊ शकतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीही या कोर्सचा उपयोग होईल. आत्तापर्यंत 14 विद्यार्थ्यांनी वर्ध्यात कोर्स केलाय असं त्यांच्या प्रशिक्षकांनी सांगितलं.