वर्धा, 28 जून: आपण दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल हाताच्या साह्याने चालवताना बघितलं असेल. मात्र दिव्यांगांसाठी असलेली ही तीन चाकी सायकल जर सौरऊर्जेवर चार्ज होऊन चालवता येत असेल तर? ही आयडिया वर्ध्यातील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांची आहे. 5 विद्यार्थ्यांनी मिळून सोलरवर चालणारी तीन चाकी सायकल 5 तयार केली आहे. आता या सोलर सायकलचं सर्वत्र कौतुक होतंय. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षासाठी एक प्रोजेक्ट देण्यात आला. हा प्रोजेक्ट दिव्यांगांकरिता होता. मॉडेल जे काही असेल ते पर्यावरणपूरक असावं अशी सूचना शिक्षकांनी दिली. त्यानुसार इंजिनीयरिगच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी गौरव वानखेडे, समीर मेश्राम, रजनीश केदार, मजहर सैय्यद, अदिती कुमार यांनी सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी सायकल तयार केली. डिजाईन अँड फॅब्रिकेशन ऑफ सोलर हायब्रीड ट्रायसिकल असं प्रोजेक्टचं नाव आहे.
प्रदूषण टाळणारी सायकल एकीकडे पेट्रोल च्या वाढत्या किमती बघता बॅटरीवर चालणारी ही सायकल पेट्रोलचा खर्च आणि प्रदूषण टाळणारी आहे. रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी सामान ने-आण करण्यासाठी ट्रान्स्पोर्टिंग साठीही नक्कीच उपयोगात येईल असे विद्यार्थ्याने सांगितले. सोलर सायकल जास्तीतजास्त 180 किलो वजन सहन करू शकते. या सोलर सायकलचे वजन अंदाजे 40 ते 50 किलो असल्याचे सांगण्यात आले. या सायकलचे मेंटेनन्स कॉस्ट देखील कमी आहे. वापरण्यासाठी अगदी सोपी प्रदूषण टाळणारी आणि वेळेची आणि श्रमाची बचत करणारी असल्याने दिव्यांगांसाठी अतिशय उपयुक्त आहे. 20 हजारांचा लागला खर्च प्रोजेक्ट दरम्यान ही सोलर सायकल तयार करण्यासाठी जवळजवळ 20 हजारांचा खर्च आला आहे. या सायकलला दोन बॅटरीज असून जास्तीत जास्त सात तासांपर्यंत या बॅटरी चालू शकतात. 12 व्होल्ट 24 वॅटच्या या बॅटरी आहेत. मोटर, बॅटरी, सोलर पॅनल, मोटर कंट्रोलर, डायनॅमो, लाईट, अक्सिलेटर, सेफ्टी स्विच, ट्रायसिकल, केबल, नट्स, सोलर, चार्ज कंट्रोलर, बॉडी फ्रेम, सीट, ब्रेक, हँडल, की पॉईंट अशा वस्तू त्यासाठी वापरल्या गेल्या आहेत. 30 चं ॲव्हरेज, 500 किलो वाहण्याची क्षमता, शिक्षकाने भंगारातून तयार केली जु’गाडी’ VIDEO पर्यावरण पुरक वाहनांच्या वापराची गरज अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेजच्या 2019 ते 2023 ची ही इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची बॅच आहे. विभागप्रमुख शैलेश वाटेकर यांच्यासह हर्षद मुमुडवार, शिरीष सोनटक्के, प्रतीक हिसासरे या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली सोलर सायकल कौतुकास्पदच आहे. नागरिकांनी देखील पर्यावरण पूरक वाहनांचा वापर करण्याकडे भर देण्याची गरज आहे