जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur News: 30 चं ॲव्हरेज, 500 किलो वाहण्याची क्षमता, शिक्षकाने भंगारातून तयार केली जु'गाडी' VIDEO

Solapur News: 30 चं ॲव्हरेज, 500 किलो वाहण्याची क्षमता, शिक्षकाने भंगारातून तयार केली जु'गाडी' VIDEO

30 चं ॲव्हरेज, 500 किलो वाहण्याची क्षमता, शिक्षकाने भंगारातून तयार केली जु’गाडी’ VIDEO

30 चं ॲव्हरेज, 500 किलो वाहण्याची क्षमता, शिक्षकाने भंगारातून तयार केली जु’गाडी’ VIDEO

सोलापुरातील शिक्षकानं शेतकऱ्यांसाठी अनोखं जुगाड केलंय. भंगारातून अवघ्या 35 हजारात मिनी फोर व्हिलर तयार केली आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 25 जून - शेतकरी आपल्या अडचणींवर काहीतरी जुगाड करून मार्ग काढत असतात. तर काही उच्च शिक्षित तरुणही एखादं जुगाड करून शेतकऱ्यांचं काम सुलभ करतात. सध्या सोलापुरातील  एका शिक्षकाने केलेल्या जुगाडाची चर्चा आहे. शिक्षक नितीन शामराव डोंगरे यांनी भंगारातून मिनी फोर व्हिलर बनवली आहे. ज्यासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून उद्यम इंक्युबॅशन सेंटरच्या माध्यमातून दिला जाणारा यंदाच्या वर्षीचा रँक थ्री साठी स्कीलेथॉन हा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी बनवलं जुगाड पंढरपुरातील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील वेल्डर आणि मोटर मेकॅनिकल या ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मिळून हे जुगाड बनवले आहे. मुळात शेती करायचं म्हटलं की अनेक गोष्टी या आर्थिक दृष्ट्या नियोजनात बांधाव्या लागतात. त्यापैकी ट्रान्सपोर्टसाठी शेतकऱ्यांचा भरपूर पैसा खर्च होत असतो. तोच प्रॉब्लेम लक्षात घेऊन नितीन यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या समावेत ही ‘मिनी फोर व्हिलर फॉर फार्मर’ म्हणजेच शेतकऱ्यांसाठी गरजेची असणारी छोटी चार चाकी गाडी तयार केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

भंगारातून गोळा केले पार्ट सुरुवातीला गाडीचे पार्ट कसे खरेदी करावे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला होता. परंतु स्क्रॅप म्हणजेच भंगरातून त्यांनी अनेक वस्तू खरेदी करत आपली आर्थिक बचत केली. शिवाय बुद्धीचा संशोधनात्मक वापर करून त्याच्यावर फायदेशीर ठरणारे असे उत्तम कार्य देखील केले. त्यानंतर खरी कसोटी होती ती म्हणजे या गाडीला अ‍ॅव्हरेज आणि त्या गाडीचे वजन किती असावे. त्यावर तांत्रिकदृष्ट्या काम करत असताना गाडीचे वजन वाढले तर अ‍ॅव्हरेज कमी होईल आणि वजन थोडेसे कमी केले तर अ‍ॅव्हरेज नक्कीच वाढेल या दृष्टीने विचार करून त्यांनी ही गाडी तयार केली. कशी आहे मिनी चारचाकी सध्या या गाडीला जवळपास 30 किलोमीटर प्रति लिटर अ‍ॅव्हरेज आहे. शिवाय यामध्ये जवळपास 400 ते 500 किलो इतके वजन शेतकऱ्यांना ने-आण करता येईल. यामध्ये 110 सीसीचे इंजिन वापरले असून आर्थिक दृष्ट्या ही वेहिकल खरेदी करत असताना लहानातल्या लहान शेतकऱ्याला फायद्याची ठरू शकेल. सध्या त्यांना ही वेहिकल बनवण्यासाठी 35 हजार रुपये इतका खर्च आला असून येत्या काळात अजून त्याची किंमत कशी कमी करता येईल शिवाय त्याच्यावर कसे काम करता येईल याकडे ते लक्ष देणार आहेत. Inspiring Story: बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी कशा प्रकारे तयार केली 250 वाणांची बँक? शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार गाडीच्या अ‍ॅव्हरेजवर आणि वजनावर संशोधन करीत ही मिनी फोर व्हिलर बनवली आहे. येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांसाठी ही गाडी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. या संशोधनातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी कमी किमतीत ही मिनी फोर व्हिलर उपलब्ध करून देणार आहोत, असे संशोधक शिक्षक नितीन डोंगरे यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात