मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha News: वर्ध्यात चाललंय काय? 2 वर्षांत तब्बल 50 बालविवाह रोखले, असं का घडलं?

Wardha News: वर्ध्यात चाललंय काय? 2 वर्षांत तब्बल 50 बालविवाह रोखले, असं का घडलं?

Wardha News: वर्ध्यात चाललंय काय? 2 वर्षांत तब्बल 50 बालविवाह रोखले, असं का घडलं?

Wardha News: वर्ध्यात चाललंय काय? 2 वर्षांत तब्बल 50 बालविवाह रोखले, असं का घडलं?

बालविवाह ही मोठी सामाजिक समस्या आहे. अल्पवयीन मुलींचे विवाह कायद्याने गुन्हा असला तरी अलीकडील काळात हे प्रमाण वाढत आहे.

अमिता शिंदे, प्रतिनिधी

वर्धा, 18 मे: बालविवाह ही मोठी सामाजिक समस्या आहे. मुलीच्या लग्नाची किमान वयोमर्यादा 18 वरून 21 वर्षे करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागात बालविवाहाच्या संख्येत भर पडत आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या बालविवाहांची आकडेवारी लक्षात घेता वर्धा जिल्हा प्रशासन आणि काही सामाजिक संस्था ते रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वर्धा जिल्ह्यात 2020 पासून आजपर्यंत 50 बालविवाह रोखण्यात जिल्हा यंत्रणेला यश आलं आहे.

वर्ध्यात रोखले 5 बालविवाह

वर्ध्यात अवैधरित्या होणारे बालविवाह थांबावे व मुलींचे आयुष्य सुरक्षित राहावे, यासाठी हेल्पलाइन, सामाजिक संस्था तसेच प्रशासन यांनी एकत्रितरित्या काम केले. त्यामुळे बालविवाह रोखण्यात य़श मिळाले आहे. जिल्ह्यात मार्च 2020 पासून 10 मे 2023 पर्यंत एकूण 50 बालविवाह रोखले आहेत. जानेवारी 2022 पासून एप्रिलअखेर 5 बालविवाह रोखले. त्यात जानेवारी एक, फेब्रुवारी 3 तर मार्चमध्ये एक बालविवाह चाईल्डलाईनकडून रोखण्यात आला. तसेच अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावरही पथकाने बालविवाह रोखले.

बालविवाहाची विविध कारणे

राज्यात अजूनही मोठ्या संख्येने बालविवाह होत आहेत. करोनाकाळामध्ये निर्माण झालेल्या समस्यांमध्ये आर्थिक टंचाई, मुलींवर लादण्यात आलेले विविध प्रकारचे निर्बंध, पैसे नसल्यामुळे मुलींची लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल, स्थलांतर अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात जनजागृतीची गरज

'चाइल्डलाईन'च्या माध्यमातून पालकांचे बालविवाह कायद्याबाबत समुपदेशन केले जाते. कुणालाही बालविवाह होणार असल्याचे समजले, तर त्यांनी तत्काळ 'चाइल्डलाईन'च्या 1098 या क्रमांकांवर फोन करून तत्काळ माहिती दिल्यास मुलींना मदत पोहोचवता येईल, असे आवाहन 'चाइल्डलाईन'ने केले आहे. गावपातळीवरील ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात. त्यांनी गावात याविषयी जनजागृती व माहिती देणे आवश्यक असते.

3 महिन्यांची गरोदर अन् पतीचे निधन, धुणी भांडी केली आज अग्निशमन दलात आहे मोहिनी! Video

बालविवाह वाढण्यामागे अज्ञान ?

ग्रामीण भागात आजही बहुतांश गावांत मुलींच्या आरोग्य, शिक्षण व हक्कांवर विविध बंधने लादली जातात. मुलांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय दिल्यानंतर शहरी व ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्थिती नसलेल्या अनेक पालकांनी मुलांना शिक्षण देण्याचा पर्याय स्वीकारला आणि मुलींना घरकामासाठी जुंपण्यात आले. तर काहींनी त्यांचा विवाह लावून दिला. ग्रामीण भागात होत असलेले विवाह अज्ञानामुळे होत असल्याचे दिसून येते.

1098 या क्रमांकावर साधा संपर्क

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 च्या काटेकोर अंमलबजावणीची गरज आहे. अनेकदा मुलींना कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. अवैधरित्या होणाऱ्या बालविवाहासंदर्भात माहिती मिळाल्यास ते रोखण्यासाठी 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Latur News: वळवळ करणारे जीव देतायंत वर्षाला 8 लाखांचं उत्पन्न, नोकरी सोडून महिलेनं नेमकं काय केलं? Video

स्थानिक यंत्रणेने लक्ष द्यावे : अधिकारी

गावात बालविवाह होऊ नये, यासाठी गावचे सरपंच, पोलिस पाटील, बालसंरक्षण समिती, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका या स्थानिक यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी आहे. याकडे लोकप्रतिधीने लक्ष ठेवून बालविवाह होत असल्यास बालविकास प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक यांच्यामार्फत जिल्हा संरक्षण कक्षाला माहिती देणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा महिला बालविकास अधिारी प्रशांत विधाते यांनी व्यक्त केले.

First published:
top videos

    Tags: Child marriage, Local18, Wardha, Wardha news