अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 6 जून: नुकताच दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अनेक मुलींनी घवघवीत यश मिळवलंय. वर्धा जिल्ह्यातील वर्धमनेरीच्या वेदांती गजानन सुकलकर हिनं तब्बल 96.60 टक्के गुण मिळवलेत. घरची परिस्थिती बेताची असाताना जिद्द आणि कष्टाच्या बळावर तिनं जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावलाय. विशेष म्हणजे वेदांतीला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. रोजमजुरी करणाऱ्या आई - वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत लेकीनं मिळवलेल्या यशांचं सर्वत्र कौतुक होतंय. वेदांतीची कौतुकास्पद कामगिरी वेदांतीनं सर्वच विषयांमध्ये कौतुकास्पद गुण प्राप्त केले आहेत. दहावीमध्ये तिला मराठीत 92, टेक्निकल विषयात 94, इंग्रजीमध्ये 94, गणितात 95, सामाजिक शास्त्रात 98 तर विज्ञान व तंत्रज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. वेदांतीचा शाळेतील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. तसेच आठवी मध्ये होणाऱ्या एनएमएमएस परीक्षेत प्राविण्य प्राप्त करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली होती.वपाचवीपासूनच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजुषा स्पर्धेत ती सलग चार वर्षे प्रथम आली आहे.
आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू वेदांती गजानन सुकलकर ही पाचवीपासून श्री सद्गुरु विद्यामंदिर वर्धमणेरी या शाळेत शिकली. अभ्यासाच्या बाबतीत प्रामाणिक आणि हुशार असल्यामुळे शिक्षकांनाही तिचा अभिमान आहे. घरची परिस्थिती आणि लेकीचे यश बघून आई-वडिलांच्या डोळ्यातही अश्रू येतात. भविष्यात एमबीबीएस करून यूपीएससीची तयारी करण्याची इच्छा वेदांतीने दर्शविल्यावर मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालविणारऱ्या आई वडिलांचे डोळे पाणावले. पंक्चरवाल्याची मुलगी तालुक्यात पहिली, निलूच्या यशाने गावकरी भारावले, Video कठोर परिश्रम करण्याची वेदांतीची तयारी आई-वडिलांनी मजुरी करुन शिकविले आणि लेकीने मिळविलेल्या यशामुळे आईवडिलांच्या कष्टाला गोड फळ आलेय. वेदांतीला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. एमबीबीएस होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारीही आहे. त्यामुळे ती तिचं एमबीबीएस होऊन यूपीएससी करण्याचं स्वप्न नक्कीच साकार करेल हीच सदिच्छा.