जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: इस्त्रीवाल्याच्या मुलीनं जिद्दीनं करून दाखवलं, लेकीचं यश पाहून कुटुंबीय गहिवरले, Video

Wardha News: इस्त्रीवाल्याच्या मुलीनं जिद्दीनं करून दाखवलं, लेकीचं यश पाहून कुटुंबीय गहिवरले, Video

Wardha News: इस्त्रीवाल्याच्या मुलीनं जिद्दीनं करून दाखवलं, लेकीचं यश पाहून कुटुंबीय गहिवरले, Video

Wardha News: इस्त्रीवाल्याच्या मुलीनं जिद्दीनं करून दाखवलं, लेकीचं यश पाहून कुटुंबीय गहिवरले, Video

वर्ध्यातील इस्रीवाल्याची मुलगी अनुष्का साखरकर हिनं मोठं यश मिळवलंय. बारावी बोर्डाच्या परीक्षेत टेक्स्टाईल विषयात तिनं 91 गुण मिळवले आहेत.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 30 मे: बारावी बोर्डाची परीक्षा शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बारावीनंतरच खऱ्या अर्थाने करियरची दिशा ठरत असते. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय. वर्धा येथील इस्त्रीवाल्याची मुलगी अनुष्का वसंतराव साखरकर हिनं घरच्या हालाकिच्या परिस्थितीवर मात करत मोठं यश मिळवलंय. टेक्स्टाईल विषयात तिला 91 गुण मिळाले आहेत. अनुष्काचं बारावी परीक्षेत यश वर्धा येथील अनुष्का साखरकर हिनं बारावी परीक्षेत मोठं यश संपादित केलंय. अनुष्का केसरीमल कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिनं टेक्स्टाईल विषयात 91 मार्क्स घेऊन कॉलेजमधून प्रथम येण्याचा मान मिळवलाय. तर कला शाखेतून बारावी उत्तीर्ण होताना तिला 76.17 टक्के गुण मिळाले आहेत. घरची हालाकिची परिस्थिती असताना मोठ्या कष्टानं मिळवलेल्या यशाबद्दल तिचं कौतुक होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वडिलांचा इस्त्रीचा व्यवसाय अनुष्काचे वडील कपडे इस्त्रीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. बारावी कला शाखेतून टेक्स्टाईल हा विषय अभ्यासता येतो. अनुष्काला कापड व्यवसायबद्दल आवड असल्यानं तिनं टेक्स्टाईल विषय निवडला. यात कापड कसे बनवतात? ते कोणकोणत्या प्रकारचे असते? त्याच्या धाग्यांचा आणि टिकवण्याचाही अभ्यास शिकायला मिळतो. अनुष्काला या विषयात आवड निर्माण झाली आणि तिनं बारावीच्या परीक्षेत तब्बल 91 गुण मिळविले. अनुष्काचं IAS बनण्याचं स्वप्न अनुष्काला कला शाखेतून पुढे जायचंय. स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपण IAS व्हावं, असं तिचं स्वप्न आहे. अनुष्का ही आई-वडिलांना एकटीच मुलगी आहे. त्यामुळे तिच्या इच्छेनुसार तिने IAS व्हावं, अशी आई-वडिलांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते पूर्णपणे सहकार्य करण्याचे प्रयत्न करत आहेत. Wardha News: बारावीत अपयश आलं तर निराश होऊ नका, एकदा अनुरागच्या संघर्षाची कहाणी ऐका, VIDEO अनुष्काला बारावत मिळालेले गुण अनुष्काला बारावीच्या परीक्षेत मराठीत 79, राज्यशास्त्र 82, चाईल्ड डेव्हलपमेंट 78, अर्थशास्त्र विषयात 73 तर इंग्रजी विषयात 54 गुण मिळाले आहेत. टेक्स्टाईलमधील 91 गुणांसह अनुष्काला एकूण 76.17% गुण प्राप्त झाले आहेत. तिच्यावर प्राचार्य, शिक्षक, कुटुंबीयांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात