वर्धा, 12 डिसेंबर : घरातील बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. विशेष म्हणजे लहान मुलं खेळताना हातात जे सापडेल ते तोंडात टाकतात. अशात बहुधा छोट्या मुलांनी थेट नाणे गिळल्याचे प्रकार ऐकायला मिळतात. वर्धा जिल्ह्यात मागील अकरा महिन्यांच्या काळात अशा तब्बल 57 घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 13 मुलांवर तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यामुळे पालकांनी घरातील लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलाच्या गळ्यात अडकलेले नाणे वेळीच काढले नाही तर मुलाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. कारण बहुतेक प्रकरणांमध्ये ही नाणी मुलांच्या फूड पाईपमध्ये अडकतात जी काही काळ थांबू शकतात परंतु जर हे नाणे मुलांच्या श्वसनमार्गामध्ये अडकले तर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत घशात नाणे, सेफ्टी पिन, तर नाका-कानात शेंगदाणे, मणी, सोयाबीनचे दाणे अडकलेल्याच्या 57 बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. त्याबाबतची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. मागील अकरा महिन्यांच्या काळात तब्बल 57 बालकांना वेळीच उपचार देऊन बरे करण्यात आले आहे. असे असले तरी 57 पैकी 13 बालकांवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. शस्त्रक्रिया करावी लागलेल्या बालकांपैकी एकाने चक्क नाणे गिळले होते. तर एकाने औषधाच्या बाटलीचे झाकण गिळल्याचा प्रकार घडला होता. स्व-संरक्षणासाठी ‘इथं’ दिलं जातं शिवकालीन शस्त्र कलेचं मोफत प्रशिक्षण,पाहा video मुलांनी काही गिळल्यानंतर काय कराल? मुलांनी नाणी वा इतर काही गिळल्यानंतर पालकांनी घरीच ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये, अनेक घटनांमध्ये ते अजून आत जाण्याची शक्यता असते. कानात काही टाकले असल्यास कानाचा पडदा फाटण्याची भीती राहत असल्याने अशावेळी प्रत्येक पालकाने तातडीने नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मुला-मुलीस उपचाराखाली आणले पाहिजे. Video : सोयाबीनला 10 हजारांपर्यंत भाव मिळेल का ? पाहा काय म्हणतात व्यापारी बालकांची काळजी कशी घ्याल? पालकांनी लहान मुलांपासून नाणे, टाचणी, पिन, शेंगदाणे, मणी आदी वस्तू दूरच ठेवल्या पाहिजे. इतकेच नव्हे तर आपल्या घरातील बच्चेकंपनी नेमके काय करीत आहे, याकडे वेळोवेळी लक्ष दिले पाहिजे.मुलांनी नाणे गिळल्यास पालकांनी कुठलाही घरगुती उपाय करू नये. अशावेळी तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. विशेष म्हणजे लहान मुलांपासून नाणे, औषधांच्या बाटलीचे झाकन आदी साहित्य दूर ठेवावे, अशी माहिती बाल रोग चिकित्सक डॉ. माधुरी मेश्राम, यांंनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.