सांगली, 12 डिसेंबर : बदलते हवामान आणि पडलेले दर यामुळे सांगली जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यावर आर्थिक ताण पडला असून आर्थिक संकट ओढवले आहे. अशातच कष्टाने पिकवलेल्या मालाला दर मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात सोयाबीनला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे. मागील वर्षी 10 हजारांच्या जवळपास गेलेला दर परत मिळेल का, याबाबत व्यापाऱ्यांचा अंदाज काय आहे, पाहुयात. सोयाबीन हे शेतकऱ्यांचं हक्काचं नगदी पिक आहे. खरिपातील पिकांमध्ये शेतकऱ्यांना उडीद-मुगानंतर हमखास पैसे देणारं दुसरं नगदी पिक म्हणजे सोयाबीन. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयाबीनला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या लागवडीचा खर्च वाढला आहे. मात्र, सोयाबीनचे भाव पडल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. Video : कोयता सोडून हाती घेतली लेखणी, ऊसतोड मजुराचा मुलगा बनला कवी! घरातच सोयाबीन साठवून ठेवले सांगलीतील मौजे डिग्रज या गावात सहाशे एकर सोयाबीनची लागवड केली आहे. येथील शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगले दर मिळत नसल्याने शेतकरी विक्री न करता घरातच सोयाबीन साठवून ठेवले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार साडेसहा ते साडेसात हजार इतका दर सोयाबीनला अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी हा भाव शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागेल, अशी ही माहिती व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. Nagpur : पुष्प प्रदर्शनात तब्बल 60 प्रकारच्या शेवंती, पाहा फुलांचे सुंदर Photos 7 हजारांचा अंदाज सोयाबीनचे दर स्थिर ठेवणे आणि ते वाढविणे या दोन्ही गोष्टी व्यापाऱ्यांच्या हातात नसून केंद्र शासनाच्या धोरणावर ठरतात. तेल, कच्चामाल आयात केल्यामुळे यावर्षी सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. मात्र, किमान दोन ते तीन महिन्यांनी दरात तेजी येण्याचा अंदाज आहे. आताची जागतिक परिस्थिती पाहाता मार्चपर्यंत सोयाबीनला 7 हजारांपर्यंत मिळू शकतो, असा अंदाज व्यापारी रमनिक दावरा यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.