मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : शेतकऱ्यांच्या कामात घोणस अळीचा अडथळा, विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय

Video : शेतकऱ्यांच्या कामात घोणस अळीचा अडथळा, विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय

घोणस अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गवतावर राहणारी ही अळी आता पिकांवर पण आढळत आहे.

वर्धा, 22 सप्टेंबर : शेतकरी नेहमीच विविध संकटांचा सामना करत असतो. अशातच आता एक नवे संकट उभे राहिले आहे. वर्धा जिल्ह्यात घोणस अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गवतावर राहणारी ही अळी आता पिकांवर पण आढळ आहे. शेतकऱ्यांना धडकी भरवणाऱ्या घोणस अळीचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून… वर्धा जिल्ह्यात या वर्षी दरवर्षी पेक्षाही जास्त पाऊस होत आहे. पावसामुळे शेतातील बांधावर गवत वाढले आहे. या वाढलेल्या गवतात विषारी घोणस अळी आढळून येत आहे. या अळीचा मानवी त्वचेशी संपर्क झाला तर तीव्र वेदना होत आहेत. या अळीला इंग्रजीमध्ये स्लज कॅटरपिलर असे नाव आहे. या नवीनच संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्लज कॅटरपिलर ही एक बहुभक्षी कीड असून बांधावरील गवतावर, झाडावर, पिकांवर आढळून येते. एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात असेल तर पानांचा हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचा प्रकार होत आहे. या व्यक्तींना अधिक त्रास शक्यतो पावसाळ्यात ही अळी आढळते. या अळीच्या अंगावर बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात. यातूनच या आळ्या स्वसंरक्षणासाठी विशिष्ट रसायन सोडतात. या रसायनाचा त्वचेशी संपर्क झाला तर तीव्र वेदना होतात. संपर्क भागात चट्टे देखील दिसतात. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही. ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात ही अळी आली तर तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसतात.  या किडीचे नैसर्गिक नियंत्रण निसर्गातील विविध मित्र किडी करतात. त्यामुळे घाबरून न जाता बांधावरील गवत काढावे, गवत काढताना विशेष काळजी घ्यावी, कीड आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी माहिती कृषी अधिकारी यांनी दिली. अद्भुत, भव्य आणि अविस्मरणीय... नागपुरातील कारंजे पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है! Video दंश झाला तर अशी घ्या काळजी काही अपवादात्मक परिस्थितीत चिकट टेप दंश झालेल्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा, यामुळे अळीचे केस सहजपणे निघून जातील, ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे, बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावण्याने आराम मिळतो. पण लक्षणे तीव्र असल्यास रुग्णालयात जावे.   प्रतीक्षा संपली! 'या' दिवसापासून भाविकांना पाहता येणार सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप! VIDEO किडीच्या नियंत्रणासाठी किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस (25 मिली प्रती 10 लि. पाणी), प्रोफेनोफोस (20 मिली प्रती 10 लि. पाणी), क्वीनॉलफॉस (25 मिली प्रती 10 लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (4 ग्रॅम प्रती 10 लि. पाणी), 5 टक्के निमार्क हे उपयुक्त ठरू शकतात, अशी माहिती कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी दिली आहे.  
First published:

Tags: Farmer, Wardha, Wardha news, शेतकरी

पुढील बातम्या