मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रतीक्षा संपली! 'या' दिवसापासून भाविकांना पाहता येणार सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप! VIDEO

प्रतीक्षा संपली! 'या' दिवसापासून भाविकांना पाहता येणार सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप! VIDEO

देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीची (Saptashringi Mata) मूर्ती मुळ रुपात पाहण्याची भाविकांनाी ओढ लागली आहे.

नाशिक 13 सप्टेंबर : आदिमाया सप्तशृंगी देवीचे (Saptashringi Mata) मूळ मनोहर रूप बघण्यासाठी सर्वच भक्तांना ओढ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते.आता मूर्ती संवर्धन प्रक्रिया पुर्ण झाली आहे. आता मात्र भाविकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नवरात्रोत्सवात (Navratri Festival) पहिल्या दिवसापासून म्हणजेच 26 सप्टेंबरपासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा कळवणचे प्रांत विकास मिना यांनी दिली आहे. जवळपास गेल्या दीड ते दोन महिन्यापासून देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होती. मूर्तीवरील 1100 किलो शेंदूर काढण्यात आला आहे.यामुळे आता देवीचे मूळ रूप समोर आले आहे. देवीचे हे मनोहररूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सर्वच भाविकांना आस लागली आहे. नवरात्रोत्सवाची प्रशासनाकडून जय्यत तयारी नवरात्रोत्सवात शेकडो भाविक दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर येत असतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा हा उत्सव बंद होता,यंदा मात्र निर्बंधमुक्त हा नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याने मोठ्या संख्यने भाविक गडावर येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला सोयी-सुविधा पुरवण्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. 1100 किलो शेंदूर काढल्यानंतर दिसलं सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप! पाहा Photos नांदुरी ते सप्तशृंगी गड वाहतुकीसाठी सुस्थितीत आहे की नाही,याची पडताळणी करावी,शक्यतो नव्या बसेसचाच वापर करावा, पायवाटेवर आरोग्य सुविधा, ठिकठिकाणी मोबाइल टॉयलेट उभारणे तसेच भाविकांसाठी यात्रा सुरू होण्याआधी हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करणे, आदी महत्त्वाच्या सूचनाही मिना यांनी दिल्या आहेत. नवरात्रोत्सवात मोफत अन्नदान उत्सव काळात भाविक मोठ्या संख्येनं येत असतात.मंदिर प्रशासनाकडून अल्प दरात निवासाची व्यवस्था तर आहेच मात्र या काळात अन्नदान हे मोफत असणार आहे.अन्नदानासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीये,त्यामुळे भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुगल मॅप वरून साभार नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी गड आहे. खाजगी वाहनाने किंवा सरकारी बसने तिथपर्यंत पोहचू शकता.
First published:

Tags: Culture and tradition, Famous temples, Nashik, Navratri

पुढील बातम्या