जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur : अद्भुत, भव्य आणि अविस्मरणीय... नागपुरातील कारंजे पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है! Video

Nagpur : अद्भुत, भव्य आणि अविस्मरणीय... नागपुरातील कारंजे पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है! Video

Nagpur : अद्भुत, भव्य आणि अविस्मरणीय... नागपुरातील कारंजे पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है! Video

नागपुरातील दोनशेहून अधिक वर्ष पुरातन फुटाळा तलावात संगीतमय कारंजे उभारण्यात आले आहे. हे भव्य कारंजे पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 21 सप्टेंबर : नागपुरातील दोनशेहून अधिक वर्ष पुरातन फुटाळा तलावात म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. लाइट शोचाही त्यात समावेश आहे. हा म्युझिकल फाउंटन जगातील सर्वात उंच फाउंटन असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागपुराच्या सुप्रसिद्ध फुटाळा तलावाच्या निसर्गसौंदर्यात आणखी भर पडली आहे. म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून संगीताच्या तालावर नागपूर शहराच्या निर्मितीचा संपूर्ण इतिहास सांगण्यात येत आहे.लाईट शोचाही त्यात समावेश आहे. आपल्या शहराच्या इतिहासाशी नाळ जोडणारी ही अद्भुत संकल्पना असल्याने नागपूरकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. दिग्गजांच्या आवाजात कॉमेंट्री म्युझिकल फाउंटनमध्ये नागपूरच्या इतिहासासंबंधी माहितीसाठी इंग्रजी आवाज दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, तर हिंदी आवाज गीतकार-दिग्दर्शक गुलजार आणि मराठी आवाज नाना पाटेकर यांनी दिलेला आहे. म्युझिकल फाउंटनचा प्रत्येक शो 34 मिनिटांचा असून दररोज दोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या म्युझिकल फाउंटन बरोबर वाजणाऱ्या संगीताला दिग्गज संगीतकार ए.आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे आणि ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पुकुट्टी यांनी म्युझिक डिझाइन केले आहे. पितृपक्षात साजरा होतो गणेशोत्सव, पाहा काय आहे ही परंपरा Video कमालीची टेक्नॉलॉजी, आकर्षक लाईट, लयबद्ध संगीत या म्युझिकल फाउंटनची खरी खासियत आहे. दिनांक 16  सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पर्यंत फुटाळा म्युझिकल फाउंटन आणि लाईट शो प्रकल्पाचा ट्रायल शो होत आहे. या ट्रायल शोच्या माध्यमातून लोकांच्या सूचना, अभिप्राय, सुधारणा नोंदविण्याचे आव्हान केले आहे. या शोला नागपूरकर जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

    4,000  दर्शकांना बसण्याची व्यवस्था प्रत्येक म्युझिकल फाउंटनच्या शोला गॅलरीमध्ये 4,000 दर्शकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. तसेच 1,100 वाहनांची पार्किंग, 12 मजली इमारत होस्टिंग फूड प्लाझा मॉल, मल्टिप्लेक्स, रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटचा समावेश आहे. प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवसापासून भाविकांना पाहता येणार सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप! VIDEO म्युझिकल फाउंटनचे दररोज दोन शो नागपुरातील फुटाळा तलावात शोचे आयोजन करण्यात आले आहे, फक्त पास धारकांनाच इथे प्रवेश मिळतो. मोफत पास नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय सावरकर नगर, खामला चौक, नागपूर येथे उपलब्ध आहेत. दररोज दोन शो चे आयोजन करण्यात आले आहे. पहिला शो हा संध्याकाळी 7 ला तर दुसरा शो हा रात्री 9 ला सुरू होतो. प्रत्येक शो हा 34 मिनिटांचा आहे.   Futala Fountain

    गुगल मॅपवरून साभार

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात