सातारा, 28 सप्टेंबर : निसर्गाच्या सौंदर्य आविष्काराचे जिवंत उदाहरण म्हणजे कास पठार आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले कास पठार आता विविध रंगीबेरंगी रान फुलांनी बहरू लागले आहे. सातारा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कास पठारावर सध्या वेगवेगळी आकर्षक फुले येण्यास सुरुवात झाली आहे. कास पठारावरील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ई-बसची सुविधा यावर्षी फुलांचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने पठारावर आठवडाभरात चांगला फुलांचा बहर पाहायला मिळणार आहे. प्रशासनाने निसर्गाचा ऱ्हास होऊ नये याचा विचार करून पर्यटकांसाठी प्रथमच ई-बसची सुविधा करून दिली आहे. प्रशासनाने मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी घातली होती. मात्र, आता कोरोना निर्बंध नसल्याने कास पठाराचे पर्यटन खूले झालेले आहे. देश विदेशातून पर्यटक येथे भेटी देत असतात. Navratri : गरब्यात नाचण्यासाठी मुलंही करतायत जय्यत तयारी, पाहा VIDEO फुले बहरण्यास सुरुवात येत्या आठवडाभरात वेगवेगळ्या फुलांचा बहर कास पठारावर पाहायला मिळणार असल्याचे वन व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले आहे. कास पठारावर सध्या तेरडा, चवर, मिकी माउस, शितेची आसवे, गेंध, नीलिमा कुमुदिनी अशी वेगवेगळी फुले बहरण्यास सुरुवात झाली आहेत. दर आठवड्याला या पठारावर वेगवेगळ्या जातीची फुले येत असल्याने पठाराचा रंग बदलताना पाहायला मिळतो.
कास पठारावरील अनेक पॉईंट दुर्लक्षित निसर्गाचा अद्भुत खजिना असलेल्या कास पठारावरील दुर्मीळ वनस्पती, विविध जातींच्या फुलांमुळे पठार जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. विस्तीर्ण कास पठारावरील मंडपघळ, प्राचीन गुहा, कुमुदिनी तलाव, सज्जन गड पॉईंटसारखे अनेक पर्यटन पॉईंट्स दुर्लक्षित आहेत. लाकडी मनोर्यावरून दिसणारा कास तलावाचा जलाशय हे पॉईंट पाहणे महत्त्वाचे आहे. कास पठार बघायला जाणाऱ्यांनी जॅकेट आणि छत्री दोन्ही घेऊन जावे. कारण त्याठिकाणी खूप थंडी आणि अचानक पाऊस येऊन हवामान बदल होत असतो.