बीड, 28 सप्टेंबर : गाड्यांचे नंबर आपले वेगळेपण दर्शवतात. व्हीआयपी नंबर किंवा लकी नंबर गाडीला असावा असे अनेकांना वाटत. पण तुमची व्हीआयपी नंबर घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला या क्रमांकासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहेत. प्रशासनाने महसूल वाढीसाठी चाॅईस क्रमांक निवडीसाठी जवळपास दुप्पट भाव वाढ केली आहे.
लकी किंवा व्हीआयपी नंबरचे क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अशी क्रेझ असलेली मंडळी शक्यतो त्यासाठी मोजावे लागणाऱ्या रकमेचा अधिक विचार करत नाहीत. राजकीय नेते, पुढारी, तरुण अशा नंबरचे हौशी असतात. मात्र, महसूल वाढावा यासाठी शासनाने या अशा नंबरसाठी अगोदरच अधिक असलेल्या रकमेत आणखी वाढ केली आहे. त्यामुळे चाॅईस नंबर पाहिजे असल्याच आता अधिकच रक्कम मोजावी लागणार आहे.
0001 नंबरसाठी तब्बल 6 लाख
ऑक्टोबर महिन्यापासून अधिक रकमेबाबत अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे हौशी लोकांच्या खिशाला झळ तर निश्चित लागणार आहे. मात्र तरीदेखील व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. फोर व्हीलरच्या 0001 या नंबरसाठी पूर्वी 4 लाख मोजावे लागायचे. आता ही रक्कम 6 लाखांपर्यंत पोहोचली आहे. 7777, 8888, 0333, 0222, 1001, 8181, 0505 या नंबरचा दर फोर व्हीलरसाठी 50 हजार होता तो आता 1 लाखांपर्यंत पोहोचला आहे.
तर दुचाकीच्या 0001 या नंबर साठी पूर्वी 50 हजार रुपये असणारी किंमत आता 1 लाख झाली आहे. 4545, 4567, 5000, 5454, 5678 या मोटरसायकल क्रमांकाला पूर्वी 5 हजार रुपये लागत होते आता 15 हजार रुपये लागणार आहेत.
Beed : नगर-आष्टी रेल्वे सुरू होण्यासाठी 95 वर्ष का लागले? पाहा Inside Story, Video
25 ते 30 लाखांचे महिना उत्पन्न
पसंती क्रमांकाच्या किमती वाढीमुळे शासनाच्या तिजोरीत महसूल वाढणार आहे. बीड जिल्ह्यातून पूर्वी महिन्याकाठी 15 ते 20 लाख महसूल जमा व्हायचा. आता तो 25 ते 30 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Video : अखेर बीडमध्ये धावली रेल्वे!, काय म्हणतात सामान्य नागरिक? पाहा स्पेशल रिपोर्ट
लिलाव पद्धतीने नंबरची विक्री
पूर्वी व्हीआयपी नंबरचे रजिस्ट्रेशन घर बसल्या करता येत नव्हते. मात्र आता व्हीआयपी नंबर हवा असल्यास तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर पब्लिक युजर म्हणून तुमच्या नावाची नोंदणी करावी लागेल. तुम्हाला निश्चित शुल्क भरून तुमच्या पसंतीचा क्रमांक आरक्षित करावा लागेल. एका नंबरसाठी अधिक मागणी असेल तर लिलाव पद्धतीने नंबर विक्री केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.