जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुण्यात दोघांची हत्या करून वाशिम गाठलं अन् जंगलात लपला; चाकण पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं

पुण्यात दोघांची हत्या करून वाशिम गाठलं अन् जंगलात लपला; चाकण पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं

फाईल फोटो

फाईल फोटो

बिल्डिंगमध्ये येवू न दिल्याच्या रागातून आरोपीने दोन जणांचा खून केला असल्याची बाब समोर आली. दोघांची हत्या केल्यानंतर हा आरोपी फरार झाला.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे 15 ऑक्टोबर : चाकण येथून दुहेरी हत्याकांडाने परिसरातील नागरिका हादरले होते. अखेर आता या हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. हा आरोपी चाकणमध्ये दोघांची हत्या करून वाशिममधील जंगलात फरार झाला होता. मात्र, अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला वाशिममधून अटक केली. प्रदीप दिलीप भगत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. बिल्डिंगमध्ये येवू न दिल्याच्या रागातून आरोपीने दोन जणांचा खून केला असल्याची बाब समोर आली. दोघांची हत्या केल्यानंतर हा आरोपी फरार झाला. यानंतर तो वाशिम येथे जंगलामध्ये वास्तव करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे चाकण पोलिसांनी त्याला जंगलात जाऊन शिताफीने ताब्यात घेतलं आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये ही घटना घडली होती. सावरदरीगावात भक्ती अपार्टमेन्टमध्ये सूरज चव्हाण आणि अनिकेत पवार यांच्याशी आरोपीचा वाद झाला होता. या वादातून आरोपीने 8 ऑक्टोबरला सूरज आणि अनिकेतवर चाकूने हल्ला करत त्यांची हत्या केली आणि यानंतर आरोपी फरार झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असता आरोपी त्याच्या मूळगावी गेला असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांचं एक पथक वाशिम येथे रवाना झालं. घरातील लोकांकडे चौकशी केली असता आरोपी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या मामाच्या गावी रूई इथं शेताच्या तांड्यामध्ये लपून बसला असल्याचं समजलं. पोलीस याठिकाणी शोध घेत असताना तो तेथील जंगलामध्ये पळून गेला. एकतर्फी प्रेमातून सुरक्षारक्षकाचं उद्यानातच महिलेसोबत धक्कादायक कृत्य, वर्ध्यातील घटनेनं खळबळ तपास पथकाने त्याचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने जंगल परिसरात रात्रभर शोध घेतला. पण आरोपी पोलिसांना चकवा देत होता. मात्र पोलिसांनी जंगलामध्ये शोध सुरूच ठेवून आरोपीला शिताफिने ताब्यात घेतलं.या अटकेनंतर आरोपीनेच हत्येच्या कारणाचा खुलासा केला. त्याने सांगितलं की मृत तरुण त्याला त्यांच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करू देत नव्हते. याच रागातून त्याने दोघांचीही हत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात