नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा 14 ऑक्टोबर : वर्ध्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री वर्ध्यातील प्रसिद्ध महावीर उद्यानात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानेच महिला सुरक्षा रक्षकावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला गेला. यात महिलेच्या गळ्यावर इजा झाली असून महिलेला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. खून का सौदागर! नाराज गर्लफ्रेंडमुळे झाला पर्दाफाश; रक्ताचा काळाबाजार करणारा तरुण गजाआड महावीर उद्यानात सायंकाळच्या सुमारास लहान मोठ्यांसह सर्वच फिरायला येत असतात. अशा गर्दीच्या ठिकाणी सर्व असतानाच सुरक्षा रक्षकाने महिलेवर अॅसिड हल्ला केला. हल्ल्यात महिला सुरक्षा रक्षक जखमी झाली असून तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या अंगावर ओढणी असल्याने गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्यासह पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. अंधश्रद्धेतून जोडप्याने घेतले 2 महिलांचे बळी; मग मांस कापून खाल्लं, देशाला हादरवणारी घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून एका 50 वर्षीय व्यक्तीने 42 वर्षाच्या महिलेवर हा हल्ला केला. आरोपीने शौचालय धुण्याचं अॅसिड महिलेवर फेकलं. या हल्ल्यात महिलेच्या मानेला आणि पाठीवर गंभीर जखम झाली आहे. मात्र, सुदैवाने या हल्ल्यात महिलेच्या चेहऱ्यावर जखम झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेवर सध्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.