मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : लता दीदींचा वर्ध्यात आहे जबरा फॅन, घरात उभारलंय मंदिर

Video : लता दीदींचा वर्ध्यात आहे जबरा फॅन, घरात उभारलंय मंदिर

X
राजीव

राजीव यांनी शालेय वयात ‘तू कितनी अच्ची है, तू कितनी भोली है’ हे गाणं गायलं, तेव्हा त्यांना पारितोषिक मिळालं होतं.

राजीव यांनी शालेय वयात ‘तू कितनी अच्ची है, तू कितनी भोली है’ हे गाणं गायलं, तेव्हा त्यांना पारितोषिक मिळालं होतं.

  • Local18
  • Last Updated :
  • Wardha, India

वर्धा, 01 डिसेंबर : पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी एका कलाप्रेमीला इतकी प्रेरणा मिळाली की, त्यांची मूर्ती आपल्या घरातील मंदिरात बसवून तिला देवाचे स्थान दिले. या कलाप्रेमीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे. राजीव देशमुख असे त्यांचे नाव आहे. लहान पणापासूनच लता दीदींच्या गाण्यांचे ते मोठे फॅन आहेत. राजीव यांनी शालेय वयात ‘तू कितनी अच्ची है, तू कितनी भोली है’ हे गाणं गायलं, तेव्हा त्यांना पारितोषिक मिळालं होतं. तेव्हापासूनच ते लता दीदींच्या गाण्याचे मोठे चाहते झाले. 

वर्ध्यातील  आर्वी येथील रहिवासी राजीव देशमुख 14 वर्षांचे होते, त्यावेळी ते लता मंगेशकर यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्यांना शाळेचा ड्रेस आणि स्कूल बॅगसह पकडले. त्यावेळी त्यांना रेल्वे पोलीस ठाण्यात नेले होते. वाढत्या वयाबरोबर त्यांनी लता दीदींची गाणी गोळा केली. आयुष्यभर त्यांची गाणी गायली. एवढेच नाही तर लता दीदींच्या फोटोला लग्नपत्रिकेतही स्थान दिले होते. 

छायाचित्रांमधून जीवनप्रवास

देशमुख बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. लता दीदींबद्दल त्यांना खूप आदर आणि प्रेम आहे. लता दीदींची विविध प्रकारची चित्रे त्यांनी आपल्या देवघरात सजवली आहेत. लता मंगेशकर यांचा बालपणापासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा प्रवास त्यांनी छायाचित्रांमधून जिवंत ठेवला आहे. लता दीदींच्या जीवनावर त्यांनी गाणी गायली आहेत. राजीव देशमुख यांना भेटल्यावर लता दीदींच्या त्यांच्या गाण्यांबाबतच्या भावना प्रकट होतात. देवघरासमोर बसून ते लता दीदींची गाणी आठवतात. 

वयाच्या 23 व्या वर्षी केली शेतीत क्रांती, अनोख्या संकल्पनेमुळे मिळाला पुरस्कार

पुण्यात घेतही होती भेट

राजीव देशमुख यांनी खामगाव येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे.  यानंतर पुण्याच्या कंपनीत रुजू झाले. 1998 मध्ये पुण्यातील एका कंपनीला पाण्याची टाकी बनवण्याची जबाबदारी घेऊन ते आर्वीला आले  तेव्हापासून ते आर्वीमध्ये कायम झाले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलगा आणि मुलगी विवाहित आहेत. मुलाने सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून त्याला संगीताचीही आवड आहे.  राजीव देशमुख 36 वर्षांचे असताना 1990 मध्ये लता मंगेशकर पुण्यात आल्या असता त्यांनी लता मंगेशकर यांची भेट घेतली.  

अंबाबाईचा प्रसाद: ग्रंथालायाला मिळाली 18 व्या शतकातील दुर्मिळ हस्तलिखत

मूर्तीची दररोज पुजा 

राजीव रोज सकाळी व सायंकाळी लता मंगेशकर यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून पुजा करतात. त्याचबरोबर सकाळच्या मंदिरात गाणी लावली जातात. शहरातील इतरही नागरिक येथील मंदिरात येतात त्यावेळी त्यांचे स्वागत केले जाते. लता दीदींबद्दलचा त्यांचा आदर आणि प्रेम कलाप्रेमींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.  

First published:

Tags: Local18, Wardha