अमरावती, 23 नोव्हेंबर : अमरावती च्या कुऱ्हा येथील निखिल मधुकर तेटू या शेतकऱ्याची शेती करण्याची पद्धत जगावेगळीच. वयाच्या 23 व्या वर्षी शेतात तब्बल 23 प्रकारच्या पिकांची लागवड करून अनोखी संकल्पना या तरुण शेतकऱ्यानं राबविली आहे. गेल्या 5 वर्षांपासून जैविक शेती करीत हा शेतकरी विविध पिकांची लागवड करीत आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत या शेतकऱ्याची आधुनिक शेती पाहता, हा शेतकरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे. गोमाता (गोकृपा अमृत) आधारित शेती करणारा निखिल शेतात कोणतेच रसायन वापरात नाही. नैसर्गिक अर्कापासून शेतात फवारणी करून केमिकल युक्त पीक निखिलच्या शेतात घेतले जाते. वनस्पती पासून बनविलेल्या अर्कामध्ये निम अर्क, करंज अर्क, बेशरम अर्क, मासोळी तैल, दशपर्णी अर्क, सीताफळ अर्क, निवडुंग अर्काचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर, शेती पिकासाठी लागणारे गांडूळ खत, कंपोस्ट खत, गोखुर खत, अशा सर्व खतांची निर्मिती सुद्धा तो स्वतः करतो. दुष्काळी भागातील कामाची दखल, पर्यावरणासाठी झटणाऱ्या रोहितला सरकारचा पुरस्कार! तब्बल 23 पिकांची लागवड संत्री, तूर, कांदा, वाल, लवकी, अंबाडी, दोडका, हादगा, पपई, झेंडू, अस्टर, काशिफळ, कोहळ, चेरी, टोमॅटो, भेंडी, लिंबू, पेरू, सीताफळ, रामफळ, अंजीर, कांदा, कारले, कढी पत्ता अशा तब्बल 23 पिकांची लागवड करून एक अनोखी संकल्पना राबविली आहे. निखिलने मिश्र पीक पद्धतीची लागवड केली आहे. त्यामुळे शेतात मित्र किडी संगोपन होते. पक्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. शेतातील सर्व वनस्पतींचा अर्क काढून वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक केली जाते. जेव्हा फवारणी करायची आहे तेव्हा त्याचा वापर केला जातो. सोशल मिडियाद्वारे मार्गदर्शन सोशल मीडियाद्वारे शेतकरी मित्रांना जैविक शेती विषयक निखिल प्रशिक्षण देतो. निखिलच्या कार्यामुळे त्याला कृषी भूषण पुरस्कार, आदर्श युवा शेतकरी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जर नोकरी मिळविण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरले नसाल तर निराश होऊ नका, शेती किंवा कुठलाही छोटा उद्योग उभारून तुमचे करियर घडवा, असा संदेश निखिल तरुणांना देतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.